Marathi Biodata Maker

फुलाफुलात हासते मराठी

Webdunia
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (14:26 IST)
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
 
आमुच्या मनामनात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदने मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी
 
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्या रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढ्ते मराठी
 
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
 
येथल्या दरीदरीत हिंड्ते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
 
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
 
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक ‘खेळ’ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
 
- कवी सुरेश भट

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल

बिनविरोध विजय असलेल्या वॉर्डांमध्ये नव्याने निवडणुका घेण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

प्रेयसीवर टीका केल्यानंतर तरुणाची हत्या, 5 आरोपींना अटक

महिला प्रीमियर लीग 2026 : UP वॉरियर्सने नवीन कर्णधाराची घोषणा केली

ऐकले नाही तर तुम्हाला मादुरोपेक्षा वाईट परिणाम भोगावे लागतील', ट्रम्पने दिली धमकी

पुढील लेख
Show comments