क्रीडापटू असणार्यांसाठी देशसेवेसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. भारतीय नौदलात क्रीडा कोट्यात विविध पदांवर भरती होत असून जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून ७ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.
नौदलातील खलाशी पदांवरील या भरतीसंदर्भातल्या अधिसूचना जाहीर केली गेली आहे त्यानुसार इच्छुक आणि योग्य उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, ईशान्येतील राज्ये, जम्मू-काश्मीर, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०२१ आहे.