Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

UPPSC Recruitment 2020: एकूण 328 असिस्टंट लेक्चरर आणि अन्य पदांसाठी अर्जाची मुदत वाढली

Webdunia
मंगळवार, 22 डिसेंबर 2020 (09:26 IST)
उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग (UPPSC) ने सरकारी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजांमध्ये विविध विषयांच्या प्रवक्ता आणि इतर पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. आयोगाच्या ताज्या अधिसूचनेनुसार उमेदवार आता 11 जानेवारी 2021 पर्यंत आपले अर्ज भरू शकतात.
 
या पूर्वी अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2020 होती ती आता वाढवून 8 जानेवारी 2021 करण्यात आली आहे. त्याच बरोबर ऑनलाईन अर्ज आणि फी जमा केल्यावर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2020 होती, जी आता वाढवून 11 जानेवारी 2021 करण्यात आली आहे.
 
या व्यतिरिक्त, आयोगाने नमूद केले आहे की जाहिरातीं मध्ये ऑनलाईन स्वरूपात अर्ज करताना पदव्युत्तर मध्ये मिळालेल्या गुंणांच्या टक्केवारीचा कॉलम होता. पण पदव्युत्तर मध्ये ग्रेड सिस्टम ने गुण दिले जातात ज्यामुळे ग्रेड सिस्टम असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यात अडचण येत होती, आता टक्केवारीसह ग्रेड भरण्याच्या पर्यायाला देखील जोडले गेले आहे. 
 
यूपीपीएससीच्या या भरतीमध्ये असिस्टंट प्रोफेसर किंवा सहाय्यक प्राध्यापक, लेक्चरर किंवा व्याख्याता आणि इतर पदांच्या एकूण 328 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. 
यूपीपीएससीच्या अधिकृत संकेत स्थळावर http://uppsc.up.nic.in/ भरतीशी निगडित अधिसूचना बघू शकतात. 
अर्ज करण्याच्या वाढीव तारखेच्या संदर्भात अधिसूचनेच्या अधिक माहितीसाठी येथे http://uppsc.up.nic.in/CandidateHomePage.html क्लिक करा.

संबंधित माहिती

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

पुढील लेख
Show comments