rashifal-2026

फुलांच्या आधी विकसित झाली फुलपाखरे

Webdunia
पृथ्वीवर फुले विकसित होण्याच्या लाखो वर्षांपूर्वीच फुलपाखरे व पतंग उदयास आले होते. अमेरिकेतील बोस्टन कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी सुमारे 20 कोटी वर्षांपूर्वीच्या पृथ्वीच्या अंगर्भागात गोठलेले खडक आणि मातीच्या ढिगार्‍याच्या नमुन्यांचे अध्ययन करुन याचा शोध लावला आहे. जर्मनीच्या ग्रामीण भागातून गोळा करण्यात आलेल्या या नमुन्यांमध्ये काही असे घयक आढळले आहेत, जे पतंगाच्या पंखांवरही आढळून येतात. यापूर्वी शास्त्रज्ञ असे समजत होते की क्रीटेनस कालखंडामध्ये फुले उमलणारी रोपटी विकसित होण्याच्या पाच ते सात कोटी वर्षांनंतर लेपिडोपटेरा प्रजातीच्या ाया पतंग व फुलपाखरांचा उदय झाला.
 
असे समजले जाते की हे पतंग स्वत:चे पोषण करण्यासाठी फुलांवरच अवलंबून होते. या अध्ययनाचे प्रमुख पॉल स्ट्रोथर यांनी सांगितले की लेपिडोपटेरा फुलांचा विकास होण्याच्या आधी जुरासिक कालखंडात म्हणजे डायनासोरच्या काळापासूनच पृथ्वीर फुलपाखरे अस्तित्वात होती. त्याकाळी हे पतंग व फुलपाखरांनी बीज उत्पादन करणार्‍या रोपड्यांमधून पाण्याचे थेंब शोषून पोषक घयक ग्रहण करु शकणारे अवयव विकसित केले होते. हे संशोधन जीव आणि रोपट्यांच्या सहविकासाचे उत्तम उदाहरण आहे. पूर्वी हे पतंग बीजांतून पोषक घटक ग्रहण करत होते. फुलांच्या विकासासोबतच फुलांतून निघणारा मकरंद त्यांचा आहार बनला. अशा प्रकारे पतंग फुलांच्या परागीकरणाच्या प्रक्रियेला मदत करु लागले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

पीजी डिप्लोमा इन रेडिओग्राफी आणि इमेजिंग टेक्नॉलॉजी मध्ये कॅरिअर करा

गोल, अंडाकृती की चौकोनी चेहरा? कोणत्या चेहऱ्याच्या आकाराला कोणता ब्लश स्टाईल शोभेल जाणून घ्या

हिवाळ्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे या पदार्थाचे सेवन करा

अर्ध भुजंगासन कसे करावे, फायदे जाणून घ्या

पंचतंत्र : गर्वाचे डोके खाली

पुढील लेख
Show comments