Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओळखा बघू काय ?

Webdunia
शनिवार, 10 एप्रिल 2021 (10:56 IST)
१. काळा खडक, पिवळं पाणी, आत पोहते चंदाराणी = कढई, तेल, पुरी
 
२. काळी काठी, तेल लाटी, वाकते पण मोडत नाही = डोक्यावरचे केस
 
३. तळ्यात तळं, तळ्यात खांब, शेपटीने पाणी पितो गंगाराम = समई, तेल, वात
 
४. दोन भाऊ शेजारी, भेट नाही संसारी = डोळे
 
५. काळ्या कोठारात म्हातारी मेली, पाचजण असून दोघांनी नेली = शेंबुड
 
६. बत्तीस चिरे, त्यात नागीण फिरे = दात आणि जीभ
 
७. सुपभर लाह्या, मधे रुपय्या = चांदण्या व चंद्र
 
८. घाटावरून आला भट, त्याचा काष्टा घट = कांदा
 
९. आकाशातून पडली घार, रक्त प्याले घटाघटा, मांस खाल्ले पटापटा = शहाळे/नारळ
 
१०. एवढसं पोर, घर राखण्यात थोर = कुलूप
 
११. एवढीशी बेबी, चुलीपुढे उभी = फुंकणी 
 
१२. तार तार तारले, विजापूर मारले, बारा वर्षे तप केले, हाती नाही लागले = उंबराचे फुल
 
१३. पाऊस नाही, पाणी नाही, रान कसं हिरवं, कात नाही, चुना नाही, तोंड कसं रंगलं = पोपट
 
१४. लहानसे झाड, त्याला इवलासा दाणा, गरज पडली की धावत जाऊन आणा = ओवा
 
१५. जांभळा झगा अंगावर, मुकुट घालते डोक्यावर = वांगे
 
१६. अटांगण पटांगण, लाल रान, बत्तीस पिंपळांना एकच पान = जीभ
 
१७. हरण पळतं, दूध गळतं = दळणाचे जाते
 
१८. आठ तोंडे, जीभ नाही, गाणे मात्र सुरेल गाई = बासरी
 
१९. काळी गाय, काटे खाय, पाण्याला बघून उभी ऱ्हाय = चामड्याची वहाण/चप्पल
 
२०. वीस लुगडी, आतून उघडी = मक्याचे कणीस
 
२१. सरसर गेला साप नव्हे, गडगड गेला गाडा नव्हे, गळ्यात जानवे ब्राह्मण नव्हे = पाण्याचा रहाट

संबंधित माहिती

Lok Sabha Election 2024:नवनीत राणांबाबतच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले

मायकोलसने 38 वर्षांचा डिस्कस थ्रोचा विश्वविक्रम मोडला

लोकसभा निवडणूक:देवेंद्र फडणवीस यांचे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन

मणिपूरमध्ये मतदान केंद्रावर गोळ्या झाडल्या

आता कैद्यांना स्मार्ट कार्डद्वारे नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधता येणार कारागृहातील 650 कैद्यांना ही सुविधा

तिन्ही सांजच्या धुक्यात

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ

गर्भधारणेदरम्यान पाय का सुजतात? यापासून आराम मिळवण्याचे उपाय जाणून घ्या

हनुमान जयंती प्रसाद इमरती रेसिपी Imarti Recipe

Liver Diseases यकृताशी संबंधित या 6 गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करू नका, ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा

पुढील लेख
Show comments