मंगळवार हा दिवस हनुमानाचा दिवस मानला गेला आहे तरी या दिवशी गणपतीची पूजा करणेही शुभ मानले गेले आहे. हा दिवस कर्जापासून मुक्तीसाठी उत्तम मानला गेला आहे. तर येते आम्ही देत आहोत मंगळवारी केले जाणारे सोपे उपाय ज्याने धन प्राप्ती सुगम होते आणि मनाला शांती प्राप्त होते.
* या दिवशी लाल गायीला पोळी खाऊ घालावी.
* मंगळवारी हनुमान मंदिर किंवा गणपती मंदिरात नारळ चढवावे.
* मंगळवारी लाल वस्त्र, लाल फळ, लाल फूल आणि लाल रंगाची मिठाई गणपतीला अर्पित केल्याने मनोकामना पूर्ण होते.
* मंगळवारी एखाद्या देवी मंदिर किंवा गणपती मंदिरात ध्वजा चढवून आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना केली पाहिजे. पाच मंगळवार पर्यंत असे केल्याने धन मार्गात येणार्या सर्व अडचणी दूर होतात.
* मनाच्या शांतीसाठी पाच लाल फूल एखाद्या मातीच्या भांड्यात गहूसोबत घराच्या गच्चीवरील पूर्वी कोपर्यात झाकून ठेवावे. एक आठवडा त्यांना हातदेखील लावू नये. पुढील आठवड्याच्या मंगळवारी ते गहू गच्चीवर पसरवून द्यावे आणि फुलं घरातील मंदिरात ठेवावे. याने आपल्या जीवनातील सर्व ताण दूर होईल आणि आपल्याला शांती जाणवेल.
* मंगळवारी या वस्तूंचे प्रयोग करणे किंवा या वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व आहे- तांबे, सोनं, केशर, कस्तुरी, गहू, लाल चंदन, लाल गुलाब, शेंदूर, मध, लाल पुष्प, शेर, मृगछाल, मसुराची डाळ, लाल कन्हेर, लाल मिरची, लाल दगड, लाल मूंगा.