Marathi Biodata Maker

दररोज किती अंडी खायची?

Webdunia
सोमवार, 12 एप्रिल 2021 (08:05 IST)
अंडी हा पोषक असा आहार. एका अंड्यात प्रथिने, बी 12 जीवनसत्त्व, कॅल्शियम तसेच अँटिऑक्सिडंट्‌स असतात. अंडे कितीही पोषक असले तरी त्याच्या बलकात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. त्यातच अंड्यांच्या अतिरेकामुळे पोटाशी संबंधित त्रास निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अंडी प्रमाणातच खायला हवीत.
 
एका अंड्याच्या बलकात साधारणपणे 200 मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असते. माणसाने दिवसभरात 300 मिलिग्रॅमपेक्षा अधिक कोलेस्टेरॉलचे सेवन करू ने. मात्र, कोलेस्टेरॉलच्या वाढीत आहारातल्या कोलेस्टरॉलची फारशी भूमिका नसते, असे काही अभ्यासांमधून समोर आले आहे. प्रत्यक्षात सॅच्युरेटेड फॅट्‌सुळे वाईट कोलेस्टरॉल वाढते.
 
निरोगी व्यक्तीने दिवसभरात किती अंडी खावीत याबाबत ठामपणे काहीच सांगता येत नाही. हा आकडा व्यक्तीगणिक बदलू शकतो. एका अभ्यासानुसार निरोगी व्यक्ती आठवड्याला सात अंडी खाऊ शकते. कोणताही आजार नसणारे तसेच अंड्यांमुळे कोणताही दुष्परिणाम होत नसल्यास दिवसभरात तीन अंडी खाता येतील.
अभय अरविंद
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

गूळ आणि ड्रायफ्रूट्स लाडू - साखरेचा वापर न करता हिवाळ्यासाठी तयार करा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ

छातीतील जळजळ दूर करतील हे सोपे घरगुती उपाय

रिटेल मॅनेजमेंट मध्ये एक्झिक्युटिव्ह एमबीए कोर्स करून करिअर बनवा

काकडीचा रस लावा, डाग रहित चमकदार मऊ त्वचा मिळवा

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

पुढील लेख
Show comments