Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अध्ययनानुसार सनस्क्रीनमुळे हाडं होतात कमजोर

अध्ययनानुसार सनस्क्रीनमुळे हाडं होतात कमजोर
, मंगळवार, 20 एप्रिल 2021 (08:27 IST)
आपल्या त्वचेला उन्हाच्या दुष्प्रभावापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन वापरण्यार्‍यांसाठी ही माहिती आवश्यक आहे. सनस्क्रीनचा अती वापर शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमीसाठी कारणीभूत ठरू शकतो. ज्याने आपले स्नायू कमजोर होतात आणि हाडं कमजोर होण्याचा धोकाही असतो.
 
जरनल ऑफ अमेरिकन ऑस्टियोपॅथिक असोसिएशन मध्ये प्रकाशित एका अध्ययनाप्रमाणे दुनियेत सुमारे एक अब्ज लोकं सनस्क्रीन वापरल्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमी असल्याच्या समस्याने त्रस्त आहे. अती सनस्क्रीन वापरल्यामुळे त्यांचे शरीर उन्हाच्या संपर्कात येत नसून ते व्हिटॅमिन डीपासून वंचित राहतात.
 
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया स्थित टॉरो युनिव्हर्सिटीच्या सहायक प्राध्यापक किम फोटेनहॉएर यांनी म्हटले की "लोकं घराबाहेर उन्हात कमी जातात आणि बाहेर निघण्यापूर्वी सनस्क्रीन लावून घेतात ज्याने त्याच्या शरीरातील व्हिटॅमिन डी निर्मितीची क्षमता संपते.
 
त्वचेच्या कर्करोगांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन न वापरता उन्हात निघण्याची सवय टाकायला हवी ज्याने शरीरातील व्हिटॅमिन डी चे स्तर वाढण्यात मदत मिळेल.
 
व्हिटॅमिन डी ची शरीरच्या कार्यप्रणालीत महत्त्वची भूमिका असते. हे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यात, दाह नियंत्रित करण्यात आणि मज्जातंतू आणि स्नायूची कार्यक्षमता वाढवण्यात मदत करतं.
 
अध्ययनाप्रमाणे आठवड्यातून दोनदा दुपारी पाच ते 30 मिनिटापर्यंत उन्हाच्या संपर्कात राहण्याने व्हिटॅमिन डी ची कमी दूर करण्यात आणि निरोगी जीवन जगण्यात मदत मिळते. या दरम्यान सनसक्रीन वापरू नये असा सल्ला संशोधक देतात कारण एसपीएफ -15 किंवा याहून अधिक एसपीएफ युक्त सनस्क्रीन व्हिटॅमिन डी3 चे उत्पादनाला 99 टक्के कमी करतं.
 
प्रोफेसर किम यांच्याप्रमाणे यासाठी अगदी कडक उन्हात समृद्ध काठी पडून राहण्याची गरज नाही केवळ थोड्या वेळासाठी हात पाय उघडे करून उन्हात फिरणेही पुरेसे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे पदार्थ...