Marathi Biodata Maker

सतत मास्क लावल्यामुळे तोंडाला वास येतो ? तर अमलात आणा हे सोपे उपाय

Webdunia
मंगळवार, 30 मार्च 2021 (08:50 IST)
हल्ली मास्क लावल्यामुळे श्र्वास घेताना तोंडातून निघणारी हवा परत तोंडात जाते ज्यामुळे तोंडाला वास येतो. अशात तोंडाचा दुर्गंध दूर करण्यासाठी हे सोपे उपाय जाणून घ्या-
 
खाण्या-पिण्याच्या सवयी
अशा वेळेस अधिक गोडाचे सेवन करणे टाळावे. तसेच चहा- कॉफीचे सेवन देखील कमी करावे. जंक फूडमुळे देखील तोंडाचा वास येतो. वास येणार्‍या पदार्थ खाणे टाळावे.
 
भरपूर प्रमाणात पाणी प्यावे
भरपूर प्रमाणात पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्याने तोंडाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळते.
 
नियमित व्यायाम
तोंडाच्या दुर्गंधाशी याचा काय संबंध असा विचार करत असाल तर चुकीचं ठरेल कारण संपूर्ण शरीर निरोगी असेल तर छोटे त्रास आपोआप नाहीसे होतात. दररोज नियमाने व्यायाम केल्याने आराम पडेल.
 
आवर्जून टाळा
ज्यांना हा त्रास अधिक प्रमाणात असेल त्यांनी चहा-कॉफी, कांदा-लसूण याचे सेवन आवर्जून टाळावे.
 
पुरेशी झोप
लवकर झोपणे व लवकर उठणे ही दिनचर्येचा भाग असल्यास अती उत्तम ठरतं. तसेच दोन्ही वेळा ब्रश करणे आवश्यक आहे. 
 
आपली लाइफस्टाईल योग्यरीत्या सुरु असून ही हा त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

नाक आणि कान टोचताना या गोष्टी लक्षात ठेवा

हिवाळ्यात दम्याशी लढण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करा

लग्नात वधूला गिफ्ट देण्यासाठी आयडिया

नैतिक कथा : दोन शेळ्यांची गोष्ट

पायांमध्ये सूज, वेदना किंवा जळजळ, ही उच्च कोलेस्ट्रॉलची ५ लक्षणे

पुढील लेख
Show comments