Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिअर शरीरासाठी थंड आहे का? 'लिटिल लिटिल' हृदयासाठी चांगलं आहे का? काय आहे सत्य

Webdunia
शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (22:18 IST)
Beer Benefites : दारू पिणाऱ्या लोकांमध्ये बिअरला मोठी मान्यता असते. व्हिस्की, रम, ब्रँडी, जिन, व्होडका आणि वाइन यासारख्या इतर प्रकारच्या अल्कोहोलच्या तुलनेत बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ते शरीराला जास्त नुकसान करत नाही, असा काही लोकांचा समज असतो.
 
आंतरराष्ट्रीय 'बीअर डे' 4 ऑगस्टला साजरा करण्यात आला, या निमित्तानं बिअरबद्दल लोकांच्या काही गैरसमाजांवर आणि वास्तवावर एक नजर टाकू.
 
बिअर प्यायल्यानं शरीराला थंडावा मिळतो का?
उष्ण वातावरणात बीअर प्यायल्यानं शरीराला थंडावा मिळतो आणि बिअर ही शरीरासाठी थंड, असा समज आहे. पण हा गैरसमज आहे, असं यकृत आणि आंत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर एस. अरुलप्रकाश यांनी सांगितलं.
 
"बिअरसह सर्व अल्कोहोलिक पेयांमध्ये अल्कोहोल असतं. अल्कोहोल थंड हवामान किंवा 'रूम टेम्परेचर' मध्ये घेतलं काय तरीही परिणाम हा सारखाच असतो. बिअर पिण्यानं उष्णता कमी होते याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही," असं ते सांगतात.

बिअर पिणं हृदयासाठी चांगलं आहे का?
बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की मर्यादित बिअर पिणं हृदयासाठी चांगलं आहे,पण हे खरं नाही. ओमनतुरार येथील पन्नोक हाय स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नवीन राजा म्हणतात,
 
"फक्त बिअर नाही तर कोणत्याही प्रकारचं अल्कोहोलिक पेय हे शरीरासाठी हानिकारक आहे.पूर्वी काही अभ्यासकांनी सुचवलं होतं की कमी प्रमाणात अल्कोहोल हृदयासाठी उपयुक्त आहे. परंतु त्यानंतर आलेले सर्व अभ्यास सांगतात की, "तुम्ही कितीही प्रमाणात मद्यपान केलं तरी ते हृदयासाठी हानिकारकच आहे,"असे ते सांगतात.
 
बिअरसह कोणतंही मद्यपान केलयास हृदयाला फायदा न होता हानीच होते, असं ते सांगतात. "जेव्हा एखादी व्यक्ती मद्यपान करते तेव्हा त्याच्या हृदयाची गती वाढते आणि रक्तदाब वाढतो. ज्यांना आधीच हृदयविकार आहे त्यांनी दारू प्यायल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
 
त्याचं प्रमाणे काही लोक सहल किंवा सुट्ट्यांच्या काळात जास्त दारू पितात. अधिक दारू प्यायल्यानं हृदयाचे ठोके अनियमित होतात. हृदय धडधडणे, मूर्च्छा येते, याला 'हॉलिडे हार्ट सिंड्रोम' म्हणतात.
 
अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी देखील अशा लोकांमध्ये उद्भवते जे दीर्घकाळ मद्यपान करत असतात.यामुळं हृदयावर परिणाम होऊन हृदय क्रिया बंद पडू शकते,असं ते सांगतात.
 
बिअर प्यायल्यानं किडनी स्टोन बरा होतो?
प्रिस्टीन केअर या गुरुग्राममधील हेल्थ केअर ऑर्गनायझेशनने किडनीबद्दलच्या भारतीय समजुतींवर सर्वेक्षण केलं. 1,000 हून अधिक लोकांच्या अभ्यासात असं आढळून आलं की बिअर पिल्यानं पित्ताशयातील खडे कमी होण्यास मदत होते, असा विश्वास तीन पैकी एकाला आहे.
 
पण हे खरं नसल्याचं 'नेफ्रोलॉजिस्ट'चं म्हणणं आहे, दारू पिण्याचा थेट परिणाम किडनीवर होत नाही, तसेच फायदाही होत नाही, असं त्याचं मत आहे.
 
बिअर प्यायल्यानं वजन वाढतं का?
बऱ्याच लोकांचा असा समज आहे की बारीक लोकांनी बिअर प्यायल्यास वजन वाढतं. बिअर प्यायल्यानं वजन वाढू शकत हे खरं आहे पण ते निरोगी वजन नाही, असं पोषणतज्ज्ञ मीनाक्षी बजाज सांगतात.
 
"एक ग्रॅम अल्कोहोल 7 कॅलरीज पुरवतं, अशावेळी बिअर प्यायल्यानं तुमचं वजन वाढणारच. परंतु ते निरोगी शरीराचं वजन नाही. जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी मद्यपान केलं तर त्यामुळं विविध शारीरिक व्याधी होतात."
 
बिअर लावल्याने केसांची वाढ होते का?
काही लोकांचा असा विश्वास आहे की शॅम्पूप्रमाणं बीअर टाळूला लावल्यानं केसांची वाढ होते. असं सांगणारे व्हीडिओदेखील पाहू शकतो. पण हे कितपत खरं आहे, या विषयी आम्ही इंडियन सोसायटी ऑफ डर्मेटोलॉजिस्ट,गायनॅकॉलॉजिस्ट आणि लेप्रोसिचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर दिनेश कुमार यांच्याशी बोललो.
 
" केस मृत पेशींनी बनलेले असतात. म्हणूनच आपण केस कापतो तेव्हा आपल्याला वेदना होत नाहीत. त्यामुळं तुम्ही मृत पेशींना काहीही लावा, मग ती बीअर असो व शाम्पू ,केस वाढण्यात त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
 
काही लोक लिंबू, अंडी केसांना लावतात, हे देखील फायदेशीर नाही. केसांना त्याच्या रूट्समधून मजबूती मिळते. त्यामुळं केसांना काही लावल्यानं केसाची वाढ होईल असं विज्ञान मानत नाही. जोपर्यंत तेलाचा प्रश्न आहे. तेल केसांना लावल्यानं ते चमकतील पण केसांची मजबूती आणि वाढ होईल,असे नाही, असं ते म्हणाले,
 
त्याचवेळी ते असंही सांगतात की, जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानं यकृत खराब होऊ शकते,व्हिटॅमिनची कमतरता आणि केस गळू शकतात.
 
बिअर पिणं शरीरासाठी हानीकारक आहे का?
जागतिक संघटनेच्या गेल्या जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे की, कोणत्याही प्रमाणात मद्यपान आपल्या शरीरासाठी उपयुक्त नाही. अल्कोहोल कमीत कमी 7 प्रकारच्या कर्करोगाशी संबंधित आहे.
 
डॉ. अरुल्प्रकाश म्हणतात की, "कोणत्याही प्रमाणात विष सेवन केले तरी ते विषच आहे. तसंच मद्यपानाचं आहे.लोकांना वाटत की बिअर पिणं उपायकारक नाही कारण त्यात अल्कोहोलचं प्रमाण कमी आहे."
 
ते सांगतात की, "जागतिक आरोग्य संघटना म्हणते की दारू ही कोणत्याही प्रमाणात प्यायल्यास हानीकारक आहे. मर्यादित मद्यपान करणारी व्यक्तीची परिभाषा काय? जे लोक कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल पितात त्यांचं यकृत 5 ते 10 वर्षात खराब होणारच."
 





Published by- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बालगणेशजींची खीर कथा

पुरुषांसाठी अश्वगंधा आणि मधाचे फायदे, खाजगी समस्या दूर होतात

रात्रीच्या जेवणात बनवा कुरकुरीत कारले चिप्स रेसिपी

पीएचडी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करा

ही चिन्हे सूचित करतात की तुमचे मूल चुकीच्या मार्गावर आहे

पुढील लेख
Show comments