Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळ्यात भिजल्यावर या 5 गोष्टी करा, अन्यथा आपण आजारी पडू शकता

Webdunia
बुधवार, 1 जुलै 2020 (18:17 IST)
पावसाळा सुरू झाल्यामुळे उकाड्यापासून आराम मिळाला आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये या वेळी कमी किंवा जास्त पाऊस पडत आहे. पावसाळा जेवढ्या मनाला आल्हाददायक असतो तेवढेच संसर्गजन्य आजाराला कारणीभूत असतं. अश्या परिस्थितीत पावसात भिजणं टाळावं. जर आपण कोणत्याही कारणास्तव पावसात भिजला असल्यास आपल्याला अधिकच खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण ह्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 
 
पावसात भिजल्याने साधारणपणे लोकांना ताप, फ्लू, खोकला आणि चक्कर येणे सारख्या समस्या दिसून येतात. आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे काही असे टिप्स सांगणार आहोत, ज्यास आपण पावसाळ्यात भिजल्यावर अवलंब करून स्वतःला आजारपणापासून वाचवू शकता. 
 
1 पावसाळ्यात भिजल्यावर कपडे बदलावे : 
जर का आपण कोणत्याही कारणास्तव पावसात भिजला असल्यास घरी आल्यावर सर्वात आधी आपले कपडे बदलावे. कारण ओल्या कपड्यांमुळे आपल्याला थंडी लागू शकते. बऱ्याचशा लोकांना या कारणास्तव सर्दी पडसं आणि ऍलर्जी सारख्या समस्या दिसून येतात. कपडे बदलल्याने थंडी लागण्याची शक्यता कमी होईल.
 
2 पावसाळ्यात भिजल्यावर केसांना वाळवून घ्या :
पावसाळ्यात जास्त भिजला असाल तर आपण कोमट पाण्याने अंघोळ करावी. नंतर आपल्या संपूर्ण शरीराला विशेषतः आपल्या केसांना वाळवून घ्यावं जेणे करून आपण आजारी पडू नये. पावसाळ्यात केस ओले झाल्यामुळे डोक्यात संसर्गाचा धोका वाढून जातो. जर आपण आपले केस स्वच्छ धुऊन वाळवाल तर संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. 
 
3 गरम अन्न आणि गरम पेय घेणे : 
पावसाळ्यात थंडावा असतो. सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे या हंगामात व्हायरल आणि बेक्टेरियल संसर्गाचा धोका वाढून जातो. या हंगामात आपण आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. 
 
4 फास्ट फूड आणि तळकट पदार्थांपासून लांब राहावं : 
पावसाळ्यात लोकं घरात असो किंवा बाहेर चहा आणि भजी खावंसं वाटतं. तेच काही लोकं फास्टफूड खाण्यास प्राधान्य देतात. तर या हंगामात बाहेरचे खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने आपले पोट खराब होऊ शकत. जर आपण भिजला आहात तर असे पदार्थ खाणं टाळावं.
 
5 हलके फुलके व्यायाम करावं : 
पावसाळ्यात सर्व लोकांनी हलके फुलके व्यायाम करावे. असे केल्याने आपण तंदुरुस्त राहाल आणि रक्त विसरणं देखील चांगले होईल. आपण बाहेरून भिजून आला आहात तर आपणास ताणण्याचे व्यायाम केले पाहिजे जेणे करून आपल्या शरीरामध्ये उब येईल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख