rashifal-2026

युरिक अ‍ॅसिड कमी करण्याच्या टिप्स,किडनीही तंदुरुस्त राहील

Webdunia
रविवार, 29 जून 2025 (07:00 IST)
आपल्या शरीरात युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली तर त्यामुळे संधिवात, सांधेदुखी आणि किडनी स्टोन सारख्या समस्या उद्भवू शकतात. युरिक अ‍ॅसिड ही अशी समस्या आहे की जर आपण वेळीच त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर ती हळूहळू वाढू लागते. ही समस्या सहसा आपल्या जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवते. यामुळे हाडांना मोठे नुकसान होऊ शकते. युरिक अ‍ॅसिड कमी करण्याचे सोपे मार्ग जाणून घेऊया.
ALSO READ: जिलेबी खाण्याचे फायदे माहित आहेत का? रसभरीत Jalebi आहारात सामील करा
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर प्यावे 
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास आणि वाढलेल्या यूरिक अ‍ॅसिडचे संतुलन राखण्यास मदत करते. जर एखाद्याला खूप जास्त यूरिकची समस्या असेल तर त्यांनी दिवसातून दोनदा 1-2 चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर एका ग्लास पाण्यात मिसळून प्यावे.
 
पुरेसे पाणी प्या
युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. यामुळे मूत्रपिंड स्वच्छ राहण्यास आणि मूत्रमार्गे युरिक अ‍ॅसिड बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे या लोकांनी दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे
ALSO READ: पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होतो, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
लिंबू पाणी प्या
लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे युरिक अॅसिड तोडण्यास आणि शरीरातून ते काढून टाकण्यास मदत करते. युरिक अॅसिडच्या रुग्णांनी दररोज सकाळी एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यावे. हे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल
ALSO READ: पावसाळ्यात यकृताचे रक्षण करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा
आवळा खा 
व्हिटॅमिन सी ने समृद्ध आवळा खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिड देखील नियंत्रित करता येते. आवळा खाल्ल्याने किडनीचे कार्य देखील सुधारते. ते खाण्यासाठी तुम्ही आवळ्याचा रस किंवा मुरंबा बनवून खाऊ शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी फक्त दोन गोष्टी वापरा

पोर्टफोलिओ डाएट हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे, फायदे जाणून घ्या

तरुण मुलांना वयस्कर महिला का आवडतात? कारणे जाणून घ्या

नैतिक कथा : रागीट पोपटची गोष्ट

Gajar Kofte या हिवाळ्यात चवदार गाजर कोफ्ते बनवा; खूप सोपी विधी

पुढील लेख
Show comments