Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गूळ आणि गरम पाणी प्या, वजन कमी करा

Webdunia
गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (12:58 IST)
सकाळी उठल्याउठल्या तोंड न धुता गरम पाणी आणि गूळ घेणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असणार. आयुर्वेदानुसार, हे वेग-वेगळ्या रोगांच्या उपचारामध्ये केवळ फायदेशीरच नव्हे तर आपले आरोग्य देखील चांगले ठेवतं. 
 
आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्या-उठल्या गरम पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत पण आपणांस माहीत आहे की तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी घेतल्यानं हे आरोग्यास फायदेशीर असतं. या मुळे वेगवेगळ्या रोगांच्या उपचारांमध्ये देखील फायदेच मिळत नाही तर हे आपल्या आरोग्यास देखील निरोगी ठेवतं. 
 
सकाळी उठल्यावर शिळ्या तोंडाने गूळ आणि गरम पाणी प्यायलाने शरीरात बरीच शक्ती येते. 
बऱ्याच लोकांना या दोघांच्या आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांबद्दल माहिती नसणार परंतु ह्याचे सेवन प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. जर आपणास या दोघांच्या विषयीची माहिती नसल्यास आम्ही आपणास गरम पाणी आणि गुळाच्या सेवनाशी संबंधित बरेच फायदे सांगणार आहोत. असे केल्यानं, आपल्या शरीरातून अनेक रोग पळून निघतील त्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहणार.
 
* वजन कमी करण्यात फायदेशीर -
जर आपणास गूळ आणि गरम पाणी पिण्याच्या फायद्यांबद्दल माहिती नसल्यास आम्ही आपणास सांगत आहोत की गुळामध्ये असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 1, बी 6 आणि व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी जाळण्यास मदत करतं, जेणे करून आपले वाढलेले पोट आत जाऊन आपले वाढते वजन कमी होणार. यासाठी आपण रात्री दोन तुकडे गुळाचे खाऊन गरम पाणी पिऊन घ्या.
 
* पोटाशी निगडित त्रास दूर होतात -
जर आपण गॅसच्या त्रासामुळे त्रस्त असाल तर आपण दररोज झोपण्याचा पूर्वी दोन तुकडे गुळाचे खाऊन गरम पाणी पिऊन घ्या. असे केल्यानं गॅस, बद्धकोष्ठता सारखे त्रास नाहीसे होतात. जर आपण सकाळी पोट स्वच्छ न होण्याचा त्रासाने वेढलेले असाल तर निश्चितपणे आपल्याला या उपायाला अवलंब करावा.
 
* अनिद्राचा त्रास असल्यास -
जर आपण देखील अश्या लोकांमध्ये येता, ज्यांना रात्री व्यवस्थित झोप येत नाही किंवा अस्वस्थता जाणवते. तर त्या लोकांनी गरम पाण्यासह गुळाचे एक किंवा दोन तुकडे खावे. गुळात असणारे अँटी डिप्रेसेंट गुणधर्म ताणतणाव दूर करण्यास आणि झोप यायला मदत करतात. 
 
* तोंडाचे आजार दूर करतं -
दररोज रात्री वेलची आणि गूळ खाऊन गरम पाणी प्यायल्याने तोंडातील सर्व जंतांचा नायनाट होतो. असे केल्यानं आपण दातांच्या कॅव्हिटी सारख्या समस्येपासून दूर राहता आणि तोंडाचा येणार दुर्गंधीचा त्रास देखील संपतो. गरम पाणी आणि गूळ घेतल्यानं आपले हिरडे देखील निरोगी राहतात.
 
* पथरीची समस्या दूर होते. 
जर आपण पथरीच्या त्रासाने त्रस्त असल्यास दर रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी एक तुकडा गुळाचा खाऊन गरमपाणी पिऊन घ्या. असे केल्यास पथरी किंवा मुतखडा गळून लघवीच्या वाटे बाहेर पडेल त्याच बरोबर गूळ खाल्ल्याने छातीमधील जळजळ आणि सांधे दुखी देखील दूर होतात.
 
* त्वचेला चमक येते -
जर आपण चेहऱ्याच्या टोन किंवा मुरुमांपासून त्रासलेले असल्यास आपण काही दिवस अनोश्यापोटी गूळ आणि पाणी घ्यावं. या मुळे आपले आरोग्याचं सुधारणारच नाही, तर आपल्या त्वचेमध्ये देखील तजेलपणा येईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

आवळ्याची चटणी रेसिपी

फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

नैसर्गिक लुकसाठी लिपस्टिकऐवजी या गोष्टी वापरून पहा

पुढील लेख
Show comments