Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गरम कढईतल्या मोहरी पेक्षा माणसं तडतड करत आहेत...

Webdunia
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (15:58 IST)
गरम कढईतल्या मोहरी पेक्षा
माणसं तडतड करत आहेत 
काय झालंय कळत नाही 
फारच चीड चीड करत आहेत...........
 
नातेवाईक असो, मित्र असो 
भयंकर स्पर्धा वाढलीय 
तेंव्हा पासूनच माणसाची 
मानसिक अवस्था बिघडलीय..............
 
कुणी कुणाला काहीच विचारत
मनानचं कसंही वागतात 
आजूबाजूच्या लोकांकडून 
जास्तच अपेक्षा ठेवतात.............
 
कमाई किती खर्च किती 
काहीच कुठे मेळ नाही 
भेटायला जाणं, गप्पा मारणं 
ह्यासाठी कुणालाच वेळ नाही.........
 
कॅपॅसिटी नसतांनाही 
खरेदी उगीच करतात
Salary राहाते तेव्हडीच
तरी हप्तेच जास्त भरतात......
 
शेजा-यानी  2 व्हीलर घेतली 
की हा घेतो 4 व्हीलर 
दूध आणायला सांगितले की 
मोजीत बसतो चिल्लर............
 
अरे, अंगापेक्षा बोंगा
कशाला वाढवून बसतो 
पगार झाल्या दिवशी 
पगार संपल्यासारखा दिसतो.........
 
पर्सनल लोन, Gold लोन
जे मिळेल ते घेतात
दिलेले पैसे मागितले तर
आपलीच गचांडी धरतात...........
 
सहनशीलता आणि  संयम 
कुठे गेला कळत नाही 
पॅकेज भरपूर मिळायलंय पण
समाधान मात्र मिळत नाही...........
 
घरी काय दारी काय 
नुसत्या किरकीरी वाढल्यात 
नवऱ्याला न सांगताच 
बायकांनी भिश्या काढल्यात...........
 
कितीही साड्या कितीही पर्स 
शर्ट, पँटी ला गणतीच नाही 
तरीही कुरकुर चालूच असते
धड साडी कोणतीच नाही...........
 
मग काय ! नवऱ्यानं म्हणावं 
तुला अक्कल नाही 
बायकोनं म्हणावं 
तुम्हालाच काही कळत नाही.........
 
दोन दोन दिवस अबोला 
कशाऊनहीं भांडणं होतात
लग्न झालं की पोरं पोरी 
वर्षातच घटस्फोट घेतात.........
 
पत्नी पीडित नव-यांच्याही 
संघटना निघत आहेत 
डोळे मोठे करून पोर
बापाकडेच बघत आहेत...........
 
दिवेलागणी, शुंभकरोती 
कुठच्या कुठे गायब झालय
शक्य असेल यामुळेच 
माणसां-माणसात वितुष्ट आलय..........
?
चित्त थोडं शांत ठेऊन 
जुनी पाने चाळावी लागतील 
यदाकदाचित पुन्हा माणसं 
एकमेकाशी प्रेमाने वागतील........

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

पुढील लेख
Show comments