rashifal-2026

मायाजाळ

Webdunia
एक खारुताई रोज आपले काम इमाने इतबारे करत असे.
ती जरुरीपेक्षा जास्त काम करून पण खुश राही.
कारण ती ज्या साठी काम करत होती त्या जंगलचा राजा सिंहाने तिला १० पोती अक्रोड द्यायचा शब्द दिला होता.
खारुताई काम करता करता थकली की तिला थोडा आराम करावा असे वाटे. पण तिला लगेच राजाचा शब्द आठवायचा आणि परत कामाला लागायची.
खारुताईला जेंव्हा इतर खारीं खेळतांना मस्ती करतांना दिसत तेंव्हा तिला पण खेळायची इच्छा व्हायची, पण लगेच तिला अक्रोड आठवायचे आणि ती परत कामाला लागायची.
राजा खूप इमानदार होता. त्याने शब्द दिला होता तर तो निश्चित पूर्ण करणार.
असाच एक दिवस उजाडला आणि सिंहाने खारुताईला १० पोती अक्रोड दिले आणि तिला स्वातंत्र्य बहाल केले.
अक्रोडांच्या पोत्यांवर बसून खारुताई विचार करू लागली की आता या अक्रोडांच मी काय करू? अख्ख आयुष्य काबाड कष्ट करून मी दातांचा भुगा करून घेतला आता अक्रोड चावायला दात कुठे आहेत?
 
ही गोष्ट आज आपल्या पैकी अनेकांची जीवन कहाणी बनली आहे.
माणूस आपल्या इच्छा मारत जीवनभर नोकरी-व्यवसाय करतो आणि पैसे कमवण्यात आयुष्य खर्ची घालवतो.
आणि निवृत्त अशा वयात होतो की ज्या पैशांसाठी आयुष्यभर काबाड कष्ट केले त्या पैशांचा उपभोग घ्यायची क्षमता नष्ट झालेली असते.
तोपर्यंत घर चालवण्यासाठी पुढची पिढी सारसावलेली असते. त्यांना या गोष्टीची कल्पना आणि जाणीव असेल का, की आपण हा फंड किंवा बँक खात्यात रक्कम शिल्लक ठेवण्यासाठी किती इच्छा मारल्या असतील? किती त्रास सहन केला असेल? किती स्वप्न अर्धवट राहिली असतील?
अशा फंडाचा आणि शिल्लक रकमेचा काय फायदा की जी कमावण्यासाठी आपलं अख्ख आयुष्य खर्च होतं आणि आपण त्याचा उपभोग पण घेऊ शकत नाही.
म्हणून खूप काम करूया, पण आनंद घेत घेत करूया.
व्यस्त राहूया पण आपली ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी उपलब्ध पण राहूया.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

धुरंधर'चा 20 व्या दिवशी 600 कोटी क्लबमध्ये प्रवेश

हिवाळ्यातील रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य पाहण्यासाठी दक्षिण भारतातील या शांत ठिकाणी नक्कीच भेट द्या

Flashback २०२५ मध्ये या बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेट फॅशनला नव्या अंदाजात सादर केले

बिगबॉस फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात

विनोदी कलाकाराच्या मुलाने जीवन संपवलं

पुढील लेख
Show comments