Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आनंदी आनंद गडे !

Webdunia
बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (11:26 IST)
आनंदी आनंद गडे !
इकडे तिकडे चोहिकडे 
 
वरती खाली मोद भरे 
वायूसंगे मोद फिरे 
नभांत भरला 
दिशांत फिरला 
जगांत उरला 
मोद विहरतो चोहिकडे  
आनंदी आनंद गडे !
 
सूर्यकिरण सोनेरी हे
कौमुदि ही हसते आहे 
खुलली संध्या प्रेमाने
आनंदे गाते गाणे 
मेघ रंगले
चित्त दंगले
गान स्फुरले 
इकडे तिकडे चोहिकडे  
आनंदी आनंद गडे !
 
नीलनभी नक्षत्र कसे
डोकावुनि हे पाहतसे 
कुणास बघते ? मोदाला; 
मोद भेटला का त्याला ? 
तयामधे तो, 
सदैव वसतो, 
सुखे विहरतो 
इकडे तिकडे चोहिकडे  
आनंदी आनंद गडे !
 
वाहति निर्झर मंदगती
डोलति लतिका वृक्षतती 
पक्षी मनोहर कूजित रे
कोणाला गातात बरे ? 
कमल विकसले 
भ्रमर गुंगले
डोलत वदले 
इकडे तिकडे चोहिकडे 
आनंदी आनंद गडे !
 
स्वार्थाच्या बाजारात
किती पामरे रडतात 
त्यांना मोद कसा मिळतो?
सोडुनि स्वार्था तो जातो 
द्वेष संपला
मत्सर गेला
आता उरला 
इकडे तिकडे चोहिकडे 
आनंदी आनंद गडे !

कवी- बालकवी(त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

Career Tips: चांगल्या करिअरची निवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा, यश मिळेल

व्यायाम करण्यापूर्वी या 10 गोष्टी करा, हृदयविकाराचा धोका दूर राहील!

उपवास स्पेशल : साबुदाण्याची टिक्की रेसिपी

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Home Care Tips:कपड्यांवरील हट्टी चिखलाचे डाग कसे स्वच्छ करावे ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments