Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चाणक्य नीती : पती-पत्नी यांच्यात कधीच वाद होणार नाही

Webdunia
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (13:45 IST)
नवरा बायकोचं नातं खूपच नाजूक असतं आणि हे नातं विश्वास आणि आदरावर टिकलेलं असतं. ज्यावेळी नात्यात विश्वास आणि आदर कमी होऊ लागतो तेव्हा हे नातं कमकुवत होऊ लागतं आणि नात्यात दुरावा येऊ लागतो. मतभेदाची स्थिती उद्भवते.
 
चाणक्याने मनुष्यावर परिणाम करणाऱ्या विषयांचा सखोल अभ्यास केला. चाणक्याच्या मते, ज्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात गोडपणा टिकून राहतो तो माणूस नेहमी आपल्या आयुष्यात यश मिळवत, याचा उलट वैवाहिक जीवनात वाद-मतभेद आणि तणाव असल्यास माणूस कितीही हुशार आणि सक्षम असलास, त्याचा जीवनात नेहमी निराशा असते. असे लोकं मानसिक सुख-शांती पासून वंचित राहतात.
 
चाणक्यामते, नवरा बायकोचं नातं बळकट करण्याची जबाबदारी दोघांची असते. म्हणून दोघांनाच या नात्याला दृढ करण्यासाठी गंभीर असायला हवं. यामुळे आपले नातं अधिक बळकट होऊ शकतं.
 
* प्रत्येक लहान गोष्ट आपसात सामायिक करावी - 
नवरा बायकोच्या नात्यात विचारांच्या देवाण-घेवाणमध्ये कोणत्या प्रकाराचा अडथळा येऊ नये. प्रत्येक लहान मोठ्या निर्णयात नवरा-बायकोचे एकमत होणे आवश्यक आहे. या गोष्टींमध्ये कमी येऊ लागतातच नवरा बायकोतील संबंध कमकुवत होऊ लागतात.
 
* एकमेकांचा आदर करावा - 
चाणक्याच्या मते, नवरा बायकोने एकमेकांचा आदर करावा. आदरात कमी येऊ लागल्यास हे पवित्र नातं कमकुवत होऊ लागतं. नवरा बायकोच्या नात्यात दोघांचा आदर समानच असतो, म्हणून कोणाच्याही सन्मानाला ठेच लागू नये.
 
* संकटाच्या वेळी एकमेकांना आधार द्या, एकमेकांसाठी सामर्थ्यवान बना - 
चाणक्याच्या मते, संकटाच्या वेळी सेवक, मित्र आणि बायकोची किंवा नवऱ्याची ओळख होते. म्हणून संकटे आल्यावर एकमेकांना कधीही सोडू नये. ज्यावेळी नवरा बायकोच नातं बळकट होतं, त्यावेळी सर्वात मोठे संकट देखील निघून जातं. नवरा बायकोला एकत्ररीत्या सर्व संकटांना सामोरा गेले पाहिजे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments