rashifal-2026

किती आणि कधी

Webdunia
शुक्रवार, 28 मे 2021 (16:10 IST)
किती प्रामाणिक असावे,
आणि कधी आभासी राहावे?
किती खोटे हसावे,
आणि कधी खरे रडावे ?
किती वर्तनात निरागस राहावे,
आणि कधी चेहऱ्यावर कृत्रिम रंग लावावे ?
किती बागेच्या फुलासारखे उमलावे,
आणि कधी रानाच्या वृक्षासारखे वाढावे ?
किती नात्यांनी घरं भरावे,
आणि कधी जगात एकटे वावरावे?
किती मनसोक्त बोलावे,
आणि कधी समाजात चूप राहावे ?
किती प्रसन्नतेने फुलावे,
आणि कधी दुःखाने झुरावे ?
किती सर्व ताब्यात घ्यावे?
आणि कधी सर्वावर पाणी सोडावे ?
किती नियमानुसार चालावे,
आणि कधी नियमाचे विरोध करावे ?
किती मुलांवर सक्ती करावे,
आणि कधी त्यांचे मित्र बनावे?
किती खाण्याचा आग्रह करावे,
आणि कधी मनरोखून खावे ?
किती उन्मुक्त फिरावे,
आणि कधी सांभाळून पुढचं पाऊल टाकावे ?
किती सर्व सोयी वापरावे ?
आणि कधी जीवनासाठी कष्ट भोगावे ?
किती दारावर तोरण लावावे,
आणि कधी कडुलिंबाची पानं खावे ?
किती आनंदात नाचावे ?
आणि कधी अश्रू ढाळावे ?
किती जुन्या गोष्टी आठवावे,
आणि कधी झालं गेलं विसरून जावे ?
किती देवाला जपावे,
आणि कधी भाग्याला रडावे ?
किती संबंधात जीव गुंतवावे,
आणि कधी मनाला आवरावे ?
किती जगण्याचे उपाय करावे,
आणि कधी कशाला पर्याय नसावे ?
किती सर्वांशी प्रेमाने वागावे,
आणि कधी कोणाशी भांडावे ?
किती प्रश्नांच्या सागरात उतरावे,
कधी आणि कसे या प्रश्नांना सोडवावे ?
किती शब्दांना जोडावे,
आणि कधी ह्यांचे उत्तर मिळावे ?
 
अंजना माणके
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

Recruitment: तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात 114 पदांसाठी भरती

या भाजीचा रस लावल्याने काही दिवसांतच सुरकुत्या दूर होतील

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

मधुमेही किवी खाऊ शकतात का? 4 फायदे जाणून घ्या

अग्निसार प्राणायाम केल्याने बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणासह सर्व आजार बरे होतील

पुढील लेख
Show comments