Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रावण मासी हर्ष मानसी

Webdunia
शुक्रवार, 11 जून 2021 (16:00 IST)
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे
 
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
 
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे
 
उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा
 
बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनी येती अवनीवरती ग्राहगोलाची की एकमते
 
सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती
 
सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही  बघता भामारोष मनीचा मावळला
 
फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
 
खिल्लारे ही  चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे
 
देव दर्शन निघती ललना हर्ष माइ ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
 
– बालकवी
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

श्रीसर्वोत्तम रौप्य महोत्सवाचा प्रथम दिवसीय सोहळा

पौष्टिक पालक डोसा रेसिपी

पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन मार्केटिंग मैनेजमेंट मध्ये करिअर करा

औषधांशिवाय आरोग्याची काळजी घ्या, हे 10 सोपे घरगुती उपाय अवलंबवा

चेहऱ्यावरील मुरुम काढण्यासाठी लसणाचा वापर

पुढील लेख
Show comments