Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळ्यात घरात चिलटे, झुरळ, मुंग्या, मच्छर ,कोळी, माशांचा त्रास असे दूर करा, सोपे उपाय अवलंबवा, नक्की फरक पडेल

Webdunia
मंगळवार, 25 जुलै 2023 (13:00 IST)
चिलटे घालवण्याचा उपाय -
1) एक भांड्यात केळ्याचे काप करून टाका नंतर त्या भांड्याला वरून प्लास्टिक कागद लावा व त्या प्लास्टिक वार सुईने दोन तीन भोकं पाडा याने सर्व चिलटे त्या भांड्यात अडकले जातील.
 
2) शेराचं झाड  किंवा कांडवेल (युफोर्बिया टिरुकाली म्हणजे इंडियन ट्री स्पर्ज) म्हणजे चिलटं आकर्षित करून घेणारं मॅग्नेट आहे. त्याची लहान फांदी लटकवून ठेवा स्वयंपाकघराच्या कोपर्‍यात. चिलटं बसलेली फांदी संध्याकाळी बाहेर नेऊन झटकून परत लावता येते, आठवडाभर एक फांदी टिकते.
 
3) अ‍ॅपल सायडर व्हीनेगर एका उंच बाटलीत अर्ध भरून त्यात थोडासा लिक्वीड सोप टाकायचा. अ‍ॅपल सायडर व्हीनेगारच्या गोड-आंबुस वासाने चिलटं तिथे आकर्षित होतात आणि आत पडतात नी मरतात. ओंगळंवाणं दिसतं...पण उपाय लागू पडतो. १-२ दिवसानी ते फेकून परत नविन भरून ठेवायचे.
 
मच्छरपासून बचावासाठी लसूण -
स्वयंपाकघरात आवर्जून आढळणारे लसूण वासाला उग्र आहे. या उग्र वासामुळे मच्छर दूर राहण्यास मदत होते. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या ठेचून पाण्यात उकळा. हे पाणी घरात स्प्रे करा.
 
मुंग्यांसाठी व्हाईट व्हिनेगर -
ऋतू कोणताही असो स्वयंपाकघरात मुंग्याचा वावर हमखास दिसतो. मग आता तुम्हांला मुंग्या दिसल्या की त्यावर थोडे व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा. पण कार्पेट किंवा एखाद्या कापडावर व्हाईट व्हिनेगर मारण्याआधी ते छोट्याशा कापडावर मारून पहा. मगच त्याचा वापर करा.
 
झुरळ्यांपासून बचाव करण्यासाठी बोरीक पावडर  -
घरातून झुरळांना हटकण्यासाठी पेस्टकंट्रोलचा पर्याय निवड्याआधी हा प्रयोग नक्की करून पहा. चमचाभर गव्हाच्या पीठामध्ये बोरीक पावडर मिसळून तयार मिश्रणाचा गोळा मळा. त्याचे लहान लहान गोळे बनवून घरातील कोपर्‍यात ठेवा. या उपायामुळे झुरळांचा वावर कमी होण्यास  मदत होते.
 
सायट्रस सालींमुळे कोळी दूर राहतात -
कोळ्यांचा घरातील वावर वाढला की कोपर्‍यांमध्ये जळमट वाढतात. म्हणूनच त्यांना दूर करण्यासाठी संत्र, लिंबू, मोसंबी अशा सायट्रस फळांच्या सालींचा वापर करा. घराची सफाई झाल्यानंतर जेथे कोळ्यांचे जाळे आढळू शकते अशा ठिकाणी या सायट्रस फळांच्या साली चोळा. बुकशेल्फ, कोपरे,दारं खिडक्यांच्या आसपास या साली चोळाव्यात.
 
कापूरामुळे माश्या दूर राहतील -
कापूरामुळे घरातील माश्यांचा त्रास दूर  होतो. घरातील कोपर्‍यांमध्ये काही कापरांचे तुकडे टाकून ठेवा. जर घरात माश्या खूपच असतील तर कापूर जाळा. त्याच्या धुरामुळे मश्या दूर होतात.
 
चिलट” घालवण्यासाठी एक भांड्यात पिकलेल्या केळ्याचे काप करून टाका नंतर त्या भांड्याला वरून प्लास्टिक कागद लावा व त्या प्लास्टिकच्या कागदाला सुईने दोन तीन छिद्र पाडा असे केल्याने सर्व चिलट त्या भांड्यात अडकले जातील. नंतर ते फेकून द्या. चिलट” घालवण्यासाठी एका उंच बाटली पाण्याने अर्धी भरून घ्या.
*घरातले चिलटे घालवण्यासाठी काय करावे ?* पावसाळा व सध्याचे दमट वातावरण या मुळे चिलटाचे प्रमाण खूपच वाढले आहे.
 
अत्यंत क्षुद्र माणसाला चिलटाची उपमा देऊन दुर्लक्षित करण्याची प्रथा असली, तरी चिलट हा सहजी दुर्लक्षित होणारा प्राणी नाही. कितीही हाकललं तरी गूं-गूं करत डोळ्यापुढं पिंगा घालणाऱ्या या चिलटाचं 'उपद्रवमूल्य' सध्या भल्याभल्यांना कळून चुकलंय. रक्त वगैरे न शोषता केवळ वारंवार डोळ्यांपुढं येऊन लक्षावधी चिलटं 'अस्तित्व' दाखवत आहेत. मच्छर आगरबत्ती, विषारी औषधं, लिक्विड मशीन असल्या कोणत्याही उपायांना न जुमानणाऱ्या या कीटकापुढं सगळ्यांनी हात टेकलेत. तरीसुद्धा त्याच्या आगमनाचे मार्ग समजून घेऊन ते बंद करणं, आलेल्या चिलटांना 'ट्रॅप'मध्ये पकडणं, असे काही मार्ग उपलब्ध आहेत. चिलटं फळांकडे आकर्षित होतात.

आपल्या डोळ्यांवर ती सारखी सारखी येतात, कारण अंडी घालण्यासाठी त्यांना ओलावा लागतो आणि आपले डोळे सतत ओलसर असतात. ओलावा कमी करणं हाच चिलटं कमी करण्याचा उपाय होय.
 
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Dinner Special : पंजाबी छोले रेसिपी

Food to Reduce Cholesterol कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावे

मसूर फ्राइड डाळ रेसिपी

तुमचा ब्रश आजारांना आमंत्रण देत आहे का?

Beauty Tips : कोको पावडर फेसपॅकने चेहरा होईल चमकदार

पुढील लेख
Show comments