Dharma Sangrah

घरपण

Webdunia
रविवार, 4 डिसेंबर 2022 (07:43 IST)
घरी निघालो भरभर, डोक्यात चक्र चालू होत म्हणून कदाचित मंडईत शिरायचं राहीलंच. मग कडेच्याच भाजीवाल्याकडून सुकलेली वांगी अन नको असलेलं पडवळ घेतलं.
 
तरी आज उशीर झाला, म्हणून खिचडी की मॅगी वर भागवू याचा गोंधळ सुरुच होता, तेवढ्यात आठवलं, कपडेही धुवायचे राहिलेत. कारण आठवडा भर एकच जीन्स रगडवत होतो.
 
खांद्यावरची बॅग सावरली, अन दुधाची पिशवी दुसऱ्या हातात घेतली. येताना पानवाल्याकडून आठवणीनं सिगरेटच पाकीट घेतलं, त्याला ब्रँड माहितीच होता, मी म्हणायच्या आत त्यांन ते हातात सोपवलं.
 
डबडबलेल्या चेहऱ्यांनी घरी पोहचलो. कुलूप काढायच्या आतच दार उघडलेलं बघून थोडासा बावरलो.
 
हळूच पाऊल टाकलं तर स्वर्गात आल्या सारखं वाटलं. चुकून दुसऱ्याच घरी शिरलो काय म्हणून हि गडबडलो. पण दोरीवरच बनियन आपलंच हे ओळखून स्थिरावलो, आता बनियन मध्ये कसली आली ओळख पण चार जागी होल अन विकत घेताना पांढरा असलेला कलर आता पिवळा जाहीर करावा असा त्याचा अवतार यावरून आपलंच असं खुणावत राहिलं.
 
दबकत जरा आत गेलो, फ्रीज उघडला तर थंड हवा चेहऱ्यावर पसरली.कोपऱ्यात बसलेलं लोणच खुद्कन दिसलं.निवडलेली मेथी अन कोथिंबीर पण कोवळी हसली.
 
सकाळी जागा नसलेला फ्रीज आता सुटसुटीत कसा? मग हळूच आणलेली वांगी अन पडवळ यांना जागेवर बसवलं.
 
रूमकडे पावलं टाकीत गेलो,तर काहीतरी सुगधं दरवळला. आठवडा भर पाणी  न भेटलेले देव चमकताना हसले अगरबत्तीचा सुगंध माझ्या पाठी पाठी येताना भासला.
 
बॅग अलगद खुर्ची वर ठेवली. साधारण कधी तोंड न दिसणारी सगळ्यांच ओझं वाहणारी  ती मोकळी कशी वाटली.
 
जाताना बेड वर स्थापलेला टॉवेल खिडकीत हवा खाताना दिसला.
 
कपाट उघडलं, तर धस्स झालं; अन सगळे घडी वाले कपडे बघून डोळेच दाटून आले.
 
रुमालावर रुमाल कसा बसला होता, सकाळी सापडत नव्हता, तो म्हणून वेगवेगळा घातलेला सॉक्स आता कोपऱ्यात बसून माझ्याकडेच बघत होता.
 
लाल पिवळा निळा असे शर्ट हँगर ला अडकलेले दिसले, तेव्हा मागच्या वाढदिवसाला तिनं भेट दिलेला जांभळा टी शर्टही सापडला.
 
हळूच येऊन बसलो टीव्ही समोर, तर परवा पासून असलेले चहाचे डाग  टीपॉय वरून गायब कसे झाले? एरवी नाममात्र टीपॉय रद्दीचं दुकान, आज मोकळा ढाकला हसला.
 
धुळीनं काबीज केलेला टीव्ही पण चमकत होता, कारण माझी बावरलेली नजर त्यात स्पष्ट होत होती.
 
दोन मिनिटं गरगरलंच, म्हणून पाणी प्यायला गेलो, तर एरवी नुसत्या लसणाच्या फोडणीवर चाललेलं किचन आज खमंग भजी अन कटाची आमटी यांच्या वासान मंत्र मुग्ध झालेलं.
 
भावना आवरून मग बाहेर आलो डोळे मिटून क्षणभर विचार करत बसलो. मग डोळे उघडून चिमटा काढत स्वप्न तर नाही म्हणून स्वतःलाच प्रश्न केला, तेवढ्यात गरम गरम भजी अन वाफाळता चहा कुणीतरी समोर धरला.
 
गिळला गेला आवंढा, आपसुक अहंकार गळून पडला. एरवी थकून आलो म्हणून दही भातावर भागवणारा मी, आज आयाता आल्याचा कडक चहाचा स्वाद घेत होता.
 
न कळत अश्रू पडले दोन गालावर, जरासं सावरलं तेव्हा लक्षात आलं....
 
आज घरी "ती" आहे म्हणून... जीच्यामुळं जगात समृद्धी अन सौख्य आलं. बस कुणासाठी तरी ती... आई आहे, कुणाची बायको तर, कुणाची बहीण अन कुणासाठी मुलगी आहे.
 
तेव्हा पटलं मनाला, पठ्ठ्या कितीही मोठा हो, पण लक्षात ठेव टायबुटातल्या शहाण्या, जगातल्या प्रत्येक "तुला" सावरायला एकतरी "ती" लागतेच. कारण....,
 
प्रत्येक घराला घरपण येण्यासाठी घरात एक तरी बाई असावीच लागते... असावीच लागते.....

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पार्टनर खोटं बोलतोय हे ओळखण्याचे सोपे संकेत

रोज बीयर पिणं आरोग्यासाठी किती धोकादायक?

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारे आणि पचायला हलके असे हिरव्या मुगाचे लाडू

World Homeopathy Day 2026: जागतिक होमिओपॅथी दिन का साजरा केला जातो? इतिहास जाणून घ्या

Dry Fruit Cake वाढदिवस निमित्त घरीच बनवा शाही ड्राय फ्रूट केक पाककृती

पुढील लेख
Show comments