Festival Posters

सकाळी उठल्यावर ह्या गोष्टींचे दर्शन झाल्यास दिवस चांगला जाईल

Webdunia
शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (07:11 IST)
सकाळी ह्या गोष्टींचे दर्शन झाल्यास शुभ असते. आपल्यासाठी दररोजची नवी सकाळ नवा आनंद, नवा उत्साह, नवे स्वप्न, घेऊन येते. आपण सकाळी झोपून उठल्यावर आपल्याला काही नवीन करण्याची आशा असते. असे म्हटले जाते की दिवसाची सुरुवात चांगली झाली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसभर काहीतरी चांगलं घडतं.

कधी कधी नैसर्गिकरीत्या देखील काही अश्या वस्तू आपल्याला दिसतात ज्या आपल्या संपूर्ण दिवसाशी निगडित असतात आणि ह्याचे दिसणे आपल्यासाठी शुुभ फळे आणतात. चला मग जाणून घेऊ या काय आहे त्या शुभ गोष्टी ज्यांचा दर्शनमात्र झाल्याने आपला दिवस चांगला जातो.
 
1 भिंतीवर सरपटणारा कोळी : 
सकाळी सकाळी जागे झाल्यावर आपल्या दृष्टीस घराच्या आत किंवा बाहेरच्या भितींवर कोळी वर चढत असताना दिसल्यास ते आपल्या होणाऱ्या बढतीचे संकेत आहे. सकाळच्या वेळेस कोळी दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे.
 
2 गाय आपल्या दारी येणे :
 सकाळच्या वेळेस गाय आपल्या दारी येऊन हंबरत असल्यास ते शुभ सूचक असते. त्यांचा अर्थ आहे की देवी लक्ष्मी स्वतःच आपल्या दारी चालत अली आहे. अशावेळी त्या गायीची पूजा करा. तिला खाण्यासाठी पोळी द्यावी. 
 
3 कानात काही स्वर घुमत असल्यास : 
सकाळी उठल्या उठल्या आपल्या कानी कुठल्या देवळाच्या घंट्यांचा नाद ऐकू आल्यास ते फार शुभ मानले गेले आहे. ह्याचा संकेत आहे की देवाची कृपा आपल्यावर होण्याचा शुभारंभ झाला आहे. आपल्या कामामध्ये येणारे सगळे अडथळे आता दूर होण्याची वेळ येऊ पाहत आहे. आपण घरातून कामानिमित्त बाहेर पडल्यावर जर का आपणास कुठल्या घरातून पूजा करण्याची आवाज किंवा आरती म्हणावयाची आवाज, किंवा हवन करीत असल्याची आवाज ऐकू आल्यास ते फार शुभ सूचक असते.
 
4 पक्ष्यांची आवाज : सकाळी उठल्यावर आपल्या गॅलरीत किंवा खिडकी किंवा गच्चीवर कबूतर, पोपट, चिमणी सारखे पक्षी येऊन बसल्यास हे शुभ असते. ह्याचा अर्थ असा की आता आपले चांगले दिवस येऊ पाहत आहे. आपल्यावर देवाची कृपादृष्टी पडत आहे आणि त्यांनी आपले दूत पक्षी म्हणून शुभ संकेत देण्यासाठी पाठविले आहे. आपल्या घरात पक्ष्यांसाठी खाण्यासाठी दाणे आणि पिण्यासाठी पाणी जरूर ठेवावे.
 
5 अशी कुठली स्त्री दिसल्यास : 
आपण सकाळी कामानिमित्त बाहेर जात असल्यास आपल्याला लाल तांबडे रंगाचे कपडे घातलेली कोणतीही सवाष्ण स्त्री दिसल्यास शुभ असते. असे समजावे की आपले नशीब आता पालटणार आहे. सवाष्ण बाई दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. 
 
ह्या व्यतिरिक्त सकाळी सकाळी शेण, सोनं, हिरवे गवत दिसल्यास शुभ मानले आहे. ह्या सर्व वस्तू आपल्याला नैसर्गिकरीत्या निसर्गाशी बांधून ठेवतात आणि आपला दिवस चांगला बनवतात. ह्या सर्व वस्तू शुभतेचे सूचक असतात. सकाळच्या वेळी हे दिसणे शुभ मानले गेले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

Shakambhari navratri 2025 शाकंभरी नवरात्र कधीपासून सुरू होते, या नवरात्रात आपण काय करावे?

श्री स्वामी समर्थांच्या नावावरून मुलींसाठी सुंदर नावे

नाताळ विशेष रेसिपी Pineapple Cake

Budh Stotra लक्ष्य साध्य करण्यासाठी बुध स्तोत्र पाठ

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments