Marathi Biodata Maker

बटाटयाच्या सालांपासून बनवा कुरकुरीत रेसिपी

Webdunia
मंगळवार, 23 जुलै 2024 (07:00 IST)
Potato peel recipe : बटाटा सोलल्यानंतर सर्वच जण बटाटयाचे साल फेकून देतात. पण तुम्हाला माहित आहे का? आपण या बटाटयाच्या सालापासून स्नॅक्स बनवू शकतो. आपण नेहमी भाज्यांच्या सालांना फेकून देतो. पण आपण या सालांपासून स्नॅक किंवा वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. तसेच बटाटयाचे साल त्वचा, केस, आरोग्यासाठी चांगले असतात. तर चला जाणून घेऊ या बटाटयाच्या सालापासून बनणारी स्नॅक्स रेसिपी
 
साहित्य-
दोन कप बटाटयाचे साल 
एकी छोटा चमचा मिरे पूड 
एक चमचा कॉर्न फ्लोर
मीठ चवीनुसार  
एक चमचा तिखट 
तेल  
एक छोटा चमचा ओरेगेनो
 
कृती-
बटाटाच्या सालापासून स्नॅक्स बनवण्यासाठी बटाटा धुवून त्याचे साल काढून घ्या. यानंतर बटाटयाचे साल वाळवून घ्यावे. आता वाळलेल्या सालांमध्ये एक चमचा कॉर्न फ्लोर टाकावे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करावे. यानंतर कढईमध्ये तेल गरम करावे. 
 
तेल गरम झाल्यानंतर बटाटयाचे साल त्यामध्ये टाकून तळून घ्यावे. शैलो फ्राय केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढावे. आता यावर मीठ, तिखट, ओरेगेनो आणि मिरे पूड घालावी. व चांगल्या प्रकारे मिक्स करावे.
 
आपले बटाटयाचे क्रिस्प किंवा स्नॅक्स बनून तयार आहे. तुम्ही यांना सॉस, चटणी किंवा संध्याकाळी चहा सोबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

स्वयंपाकघरातील धणे भारतात कुठून आले माहिती आहे का? इतिहास जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

वूलन कोट पॅक करण्यापूर्वी बॅगेत या दोन गोष्टी ठेवा; पुढच्या हंगामात तो अगदी नवीन दिसेल

महादेव आणि पार्वती यांच्या नात्यातून या गोष्टी शिका, वैवाहिक जीवन प्रेमाने भरेल

Shiv Jayanti 2026 Wishes In Marathi शिवजयंती शुभेच्छा

Valentine's Day Special Chocolate Dessert Recipe; घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून बनवता येतील

पुढील लेख
Show comments