Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरोग्यवर्धक आणि चविष्ट हरभराडाळीच्या पिठाचे पराठे

Webdunia
रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (12:59 IST)
सकाळच्या न्याहारीसाठी आवश्यक आहे की पोषक घटकाने समृद्ध असलेले खावे. परंतु आरोग्यासह चव देखील महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत हरभराडाळीच्या पिठाचा पराठा बनवा हे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच परंतु चव देखील उत्कृष्ट आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
साहित्य- 
 1 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप हरभराडाळीचे पीठ, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, मीठ चवीप्रमाणे,1 चमचा कसुरी मेथी, 1/2 चमचा ओवा,1/2 चमचा जिरे,हिंग,गरममसालापूड,तेल गरजेनुसार.  
 
कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात हरभराडाळीचे पीठ,हिंग,गरम मसाला, तिखट,हळद सर्व जिन्नस एकत्र करा. चवीप्रमाणे मीठ आणि तेल घालून मिसळा. आता गव्हाच्या पिठात लागत लागत पाणी घालून पोळ्यांसाठी मळतो तशी कणीक मळून घ्या. या कणकेच्या लाट्या किंवा लहान लहान गोळे बनवून लाटून घ्या. त्या लाटलेल्या पोळी मध्ये हरभरा डाळीचे तयार केलेले मिश्रण भरा आणि सगळी कडून बंद करून लाटून घ्या.  
तयार पोळी गरम तव्यावर घालून थोडं तेल सोडून दोन्ही कडून सोनेरी रंग येई पर्यंत शेकून घ्या. गरम हरभराडाळीचे पराठे खाण्यासाठी तयार हे पराठे दह्यासह किंवा चटणीसह सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

Rangpanchmi 2025 : त्वचेला लागलेला रंग निघण्यासाठी या वस्तूंचा करा वापर

Rangpanchami Special Recipe बदाम शेक

रिकाम्या पोटी ब्रेड खाणे फायदेशीर आहे का? जाणून घेऊया त्याचे फायदे आणि तोटे

एमबीए इन इंफॉर्मेशन सिस्टम्स मध्ये करिअर करा

वयाच्या आधी त्वचा का सैल होते, त्वचा घट्ट कशी करायची जाणून घ्या

पुढील लेख
Show comments