Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झटपट तयार होणारी रेसिपी टोमॅटो राईस

Webdunia
रविवार, 19 सप्टेंबर 2021 (10:48 IST)
साहित्य 
1 कप कांदा, चिरलेला
1/2 कप टोमॅटो, चिरलेला
1 टीस्पून आले लसूण पेस्ट
१ चमचा लाल तिखट
1 टीस्पून हळद पावडर
1 टीस्पून जिरे
1 टीस्पून काळी मिरी
1 तमालपत्र
2 लवंगा
 
कृती-
1. एक पॅन घ्या आणि त्यात कोरडे मसाले आणि चिरलेला कांदा तळून घ्या. कांदा मऊ झाल्यावर चिरलेला टोमॅटो, आले लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट घालून मिक्स करावे. हे मिश्रण किंचित मऊ झाल्यावर त्यात पाणी घाला. तुमचे धुतलेले तांदूळ घाला आणि तांदूळ शिजू द्या. कोथिंबीरीने सजवा आणि सर्व्ह करा.
 
टिपा
जर तुम्हाला तांदूळ अधिक मसालेदार बनवायचा असेल तर तुम्ही त्यात एक कप टोमॅटो प्युरी देखील घालू शकता.
त्यात आवडीप्रमाणे पनीर देखील घालू शकता.
जर तुम्हाला तांदळामध्ये क्रीमयुक्त पोत हवा असेल तर त्यात 6-7 चमचे क्रीमही घालता येईल.
पुदीना चटणी आणि रायता बरोबर टोमॅटो राईसची चव छान लागते.
जर तुम्हाला वजन नियंत्रित करायचे असेल तर पांढऱ्या तांदळाऐवजी तुम्ही ब्राऊन राइस घालू शकता.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments