Marathi Biodata Maker

Breakfast recipe : रवा अप्पे

Webdunia
सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 (08:00 IST)
साहित्य-
1 कप रवा 
1 कप दही
1/2 कप पाणी 
1 छोटा कांदा 
1 गाजर
1 हिरवी मिरची 
1/4 कप कोथिंबीर 
मीठ चवीनुसार 
1/2 मोहरी 
8-10 कढी पत्ता 
2 चमचे तेल 
1/2 चम्मच बेकिंग सोडा 
 
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात रवा घ्यावा. त्यात समान प्रमाणात दही घालावे. जर घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे पाणी घालून पीठ तयार करावे. आता अर्धा तास भिजत ठेवावे. रवा फुगल्यावर सर्व चिरलेल्या भाज्या त्यात मिक्स कराव्या. यानंतर  मीठ घालावे. आता तुम्हाला फोडणी तयार करण्यासाठी एका कढईत तेल गरम करून मोहरी घालावी. मोहरी तडतडायला लागली की त्यात कढीपत्ता घालावा. आता हा तडका पिठात मिक्स करावा. व शेवटी बेकिंग सोडा घालवा. व मिक्स करून घ्यावे. आता अप्पे पात्र गरम करून आणि ब्रशच्या मदतीने त्यात तेल लावावे. तेल लावल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने पीठ भरावे. शेवटी झाकून मध्यम आचेवर शिजवावे. तर चला तयार आहे आपले रवा अप्पे नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

हिवाळा विशेष ब्रेकफास्टमध्ये बनवा Healthy Egg Sandwich Recipe

हिवाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, हिवाळ्यातील आरोग्य टिप्स जाणून घ्या

बारावीनंतर मानसशास्त्रात करिअर करा

सणासुदीला दिसा खास; ५ सोप्या स्टेप्समध्ये शिका घरच्या घरी मेकअप!

मासिक पाळीच्या पीरियड पँटी सुरक्षित आहेत का?

पुढील लेख
Show comments