Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा : भागवत सोनवणे

Webdunia
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (19:28 IST)
पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे. यावेळी सोनावणे म्हणाले, प्रत्येक मंडळाने शहरातील महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत, वीज महावितरण आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची रीतसर परवानगी काढावी. गणरायाच्या आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक काढता येणार नाही. शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही परिस्थितीत डिजेला परवानगी मिळणार नाही. पारंपारिक वाद्यांचा आवाजही निर्धारित डेसिबलपेक्षा जास्त नसावा. कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. 
 
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली  
खांदेश्वर पोलीस ठाणेहद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळ, महिला दक्षता समिती सदस्य व शांतता कमिटी सदस्य यांच्या बैठक पार पडली. श्री कृपा हॉल सेक्टर 6 खांदा कॉलनी येथे सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल भागवत सोनवणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर पोलीस ठाणे देविदास सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळ, महिला दक्षता समिती सदस्य व शांतता कमिटी सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  
 
प्रशासनाच्या सूचनांबाबत माहिती दिली
कोरोना महामारीमध्ये प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन होणे व गर्दी टाळणे यासाठी उपाययोजना करण्याबाबत व काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले व सविस्तर माहिती देऊन मास्कचे वाटप करून मिटींगची सांगता करण्यात आली. यावेळी समस्त गणेशोत्सव मंडळ, महिला दक्षता समिती सदस्या, शांतता कमिटी यांनी सहभाग घेऊन पूर्णपणे मदत कार्य चालू ठेऊ व पूर्ण सहकार्य करू याचे आश्वासन दिले. सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्ती ही चार फूट आणि घरगुती गणेशमूर्ती 2 फुटांपेक्षा मोठी नसावी. आरती, भजन, कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमांना गर्दी करू नये. 

संबंधित माहिती

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

पुढील लेख
Show comments