Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आधिवासी बांधवांना दिलासा, महसूल विभागाने ३०६ हेक्टर वनहक्क जमिनी नावे केल्या

Webdunia
मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:33 IST)
वसईमधील ५० आधिवासी बांधवांना वसईच्या महसूल विभागाने ३०६ हेक्टर वनहक्क जमिनी त्यांच्या नावावर केल्या आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हे गिफ्ट आधिवासी बांधवाना मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचा वातावरण आहे.
 
वसईच्या महसूल विभागाने अधिवासी बांधवांनी अतिक्रमण केलेल्या वनजमिनीवरील त्यांच्या नावे वनपट्टी लावल्या आहेत. वनजमिनीवर आपल्या नावे वनपट्टी लावण्यासाठी आधिवासी बांधवांनी तब्बल ३५ ते ४० वर्ष शासनाशी संघर्ष केला होता. त्यानंतर १९९६ साली आधिवासी बांधवांच्या बाजूने वनहक्क कायदा काढला गेला. माञ त्यात बऱ्याच ञुटी होत्या. त्यानंतर २००६ साली त्यात सुधारणा करुन, नव्याने सुधारीत वनहक्क कायदा अंमलात आला. दरम्यान आधिवासीच्या वनजमिनी त्यांच्या नावावर झाल्या आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आधिवासीना वनपट्टी मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
 
वसई प्रांत अधिकाऱ्यांनी आज वसईतील भाताने, आडाणे, भिनार, सकवार, वाडघर येथील ५० आधिवासी बांधवाना ३०६ हेक्टर जमिनीच्या वनपट्टी त्यांच्या नावावर केल्या आहेत. यामुळे आता ते या जमिनीवर शासकीय योजनेचा लाभ घेतील. तसेच शेती, भाजीपाला लागवड करुन, उत्त्पन घेवू शकतात. त्यांच्या नावावर त्या जमिनीचा सातबारा ही आता करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आधिवासी खऱ्याअर्थाने जमिनीचे मालक होणार असल्याच मत प्रांत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित माहिती

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

पुढील लेख
Show comments