Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत मुसळधार पावसाने घेतला दहा जणांचा जीव

Webdunia
रविवार, 18 जुलै 2021 (10:00 IST)
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चेंबूर भागात घराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे.दोन जणांवर उपचार सुरू आहेत.वाशी नाका, न्यू भारत नगर माहुल इथे ही दुर्घटना घडली.
 
रात्री एकच्या सुमारास हा दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे झाड पडून भिंतीवर कोसळलं आणि भिंत पडली. राजावाडी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत.
 
विक्रोळी इथे पावसामुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीनजणांचा मृत्यू झाला आहे तर दोनजण जखमी झाले आहेत. विक्रोळी मधल्या सूर्या नगर,पंचशीळ चाळ भागात ही दुर्घटना घडली आहे.जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
रात्री पावणेतीनच्या सुमारास सतत पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे.
 
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
कांदिवली पूर्व भागात हनुमान नगर भागात पावसाचं पाणी अनेक घरांमध्ये घुसलं आहे.सायन,किंग्जसर्कल, लालबाग, प्रभादेवी या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.
 
आयएमडीने रात्री वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे.
 
रात्रभर झालेल्या पावसामुळे दादर,परळ,सायन,कुर्ला,भांडुप या ठिकाणी पाणी साचल्याने सीएसटी-ठाणे सेवा स्थगित करण्यात आली आहे. ठाणे ते कल्याण आणि त्यापुढील मार्गांवरील सेवा सुरू आहे.अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.पावसामुळे सीएसटी-वाशी रेल्वे सेवाही बंद करण्यात आली आहे.
 
भारतीय हवामान के.एस.होसाळीकर यांनी ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार,"रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी भरलं आहे.अतिशय अल्प कालावधीत विक्रमी स्वरुपाचा पाऊस झाला आहे.महानगरपालिका आणि राज्याचा आपात्कालीन विभाग यांनी पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत पुरवण्याचं काम सुरू केलं आहे".

१८ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजता सांताक्रुझ इथे 217.5 मिलीमीटर, कुलाबा इथे 178 ,महालक्ष्मी इथे 154.5, वांद्रे इथे 202,जुहू विमानतळ 197.5, मीरा रोड 204,दहिसर 249.5,भायंदर इथे 174.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
 
बोरिवली पूर्व भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
पुढील 24 तासांसाठी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या बरोबरीने गडगडणे आणि वेगवान वाऱ्यांचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
सखल भागात पाणी भरण्याची शक्यता आहे. भरतीच्या वेळी काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. पावसामुळे रस्ते वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी बजेटला निरुपयोगी म्हटले

LIVE: दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार

दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार! म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

'पानिपतची तिसरी लढाई मराठ्यांचा पराभव नाही, तर त्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे', फडणवीस विधानसभेत म्हणाले

दुर्गा पूजा पंडालमध्ये भीषण आग, १० वर्षांचा मुलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments