Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मला कृष्णकुंजवर न्याय मिळणार’,संजीवनी काळे यांनी व्यक्त केली आशा

Webdunia
शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (15:27 IST)
नवी मुंबई मनसेचे शहरअध्यक्ष गजानन काळे यांच्यावर त्यांच्याच पत्नी संजीवनी काळेंकडून काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काळे यांच्यावर मानसिक, शारीरिक छळाचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.याच पार्श्वभूमीवर संजीवनी काळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहोचल्या होत्या.यावेळी राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि रिटा गुप्तांसोबत संजीवनी काळे यांची चर्चा झाली. मला कृष्णकुंजवर न्याय मिळणार’,अशी संजीवनी काळे यांनी आशा व्यक्त केली आहे.
 
शर्मिला ठाकरे आणि रिटा गुप्ता यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर संजीवनी काळे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळेस संजीवनी काळे म्हणाल्या की,‘सध्या राज ठाकरे पुण्याला आहेत.मी शर्मिला ठाकरे यांना भेटली आहे. त्या मला योग्य तो न्याय देणार आहेत. माझं सगळं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आहे.मला कृष्णकुंजवर न्याय मिळणार आहे, हे मला माहित आहे. माझं पत्र शर्मिला वहिनींना दिलं असून माझी सर्व बाजू त्यांनी ऐकून घेतली आहे. त्यांनी मला न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे.’
 
पुढे गजानन काळेंच्या पत्नी म्हणाल्या की, आज सेशन कोर्टात बेल संदर्भात सुनावणी होणार आहे.भारतीय न्याय व्यवस्था आणि संविधानावर माझा विश्वास आहे.तिथे सुद्धा मला न्याय मिळणार आहे.’
 
‘२००८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतर १५ दिवसांनी गजानन माझ्यासोबत किरकोळ घरगुती कारणावरून भांडण करून माझा सावळा रंग आणि माझी जात कारणावरून मला टोमणे मारू लागला,जातीवाचक शिवीगाळ करू लागला. तो मला बोलला की, तू सावळी आहेस,तुझी जात वेगळी आहे.तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट बघून मी तुझ्याशी लग्न केले परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही असे बोलला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यावेळी गजानन याने मला मारहाण केली होती,’ असं संजीवनी काळे यांनी पोलिसांना एफआयआरमध्ये सांगितलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

मुलीच्या भावाने केले प्रियकराचे निर्घृण खून

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

भारतीय तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई, अंदमानच्या समुद्रामधून 5 टन ड्रग्ज जप्त

पुढील लेख
Show comments