Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉर्न दाखवून केलं मास्टरबेट, शिक्षक ‘गोत्यात’

Webdunia
गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (08:10 IST)
मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पॉर्न चित्रफीत दाखवून मास्टरबेट केल्याचा आरोपा अंतर्गत शिक्षकाला एक वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. 30 ऑगस्ट 2016 साली या शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील मजकूर दाखवला होता. 2016 मध्ये त्या विद्यार्थीनीचे वय साधारण 5 वर्षे होते. 
 
अधिक माहितीनुसार, या मुलीला तिच्या काकाने तिला सायंकाळी 5.30 वाजता अरबी शिकण्यासाठी शिक्षकाकडे सोडून गेला होता.
 
यांनतर संध्याकाळी मुलीला घेऊन तिचे वडील घरी गेले. घरी गेल्यावर आईने विचारले तुला आज काय शिकवलं? त्यावेळी मुलीने सांगितल्यावर आईला धक्काच बसला. शिक्षकाने तिला अश्लील फोटो दाखवले आणि त्यांनी काही तरी केले. असं त्या अल्पवयीन मुलीनं तिच्या आईला सांगितलं. असा सर्व प्रकार मुलीच्या आईने तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. यावरून पोलिसांनी (Police) तातडीने कारवाई करत शिक्षकाचा फोन जप्त केला.आरोपपत्र दाखल झाल्यानंतर शिक्षकाने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. तसेच, मुलीचे पालक फी भरत नसल्यामुळे मला फसवण्याचा कट करत आहेत, असा आरोप देखील केला आहे.
 
दरम्यान, मुलीने न्यायालयात सांगितलं की, घटनेच्या वेळी तिच्या बेंचसमोर आणखी एक विद्यार्थी बसला होता. आरोपीने त्याला चुकीचे काम करण्यास सांगितले होते.विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी कोर्टाला सांगितले की, मुलीला दाखवलेला व्हिडओ आणि फोटो अश्लील आहेत. मुलीचे पालक त्याला का फसवतील याचे आरोपीने वैध कारण दिलेले नाही.
ते केवळ फीसाठी हे करणार नाहीत.
 
दरम्यान, नंतर मुलीच्या कुटुंबीयांनी फी जमा केली नाही, याचा कोणताही पुरावा नाही.आरोपीने मुलीच्या पालकांवर फी भरण्यासाठी दबावही केला नाही.कोणतेही पालक आपल्या मुलाचे भविष्य फीसाठी पणाला लावणार नाहीत.अशा घटनांचा मुलींच्या शिक्षणावर परिणाम होतो, असं न्यायाधीश भारती काळे  यांनी म्हटलं आहे.त्यानंतर न्यायाधीशांनी शिक्षकाला 1 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आणि 10 हजार दंड ठोठावला आहे.
10 हजार दंडांपैकी 8 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित मुलीला देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख