rashifal-2026

मुंबईत सायको किलर, मध्यरात्री 15 मिनिटात दोघांची दगडाने ठेचून हत्या

Webdunia
शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (11:15 IST)
मुंबईत भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात शनिवारी मध्यरात्री दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. अवघ्या 15 मिनिटाच्या अंतराने या दोन्ही हत्या झाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका सायको किलरला अटक केली आहे. सुरेश शंकर गौडा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईच्या रस्त्यांवर हा सायको किलर मोकाट फिरत होता.
 
कोणतही कारण नसताना आरोपीने दोन्ही ठिकाणी फुटपाथवर झोपलेल्या दोन व्यक्तीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून हत्या केली होती. धक्कादायक म्हणजे आरोपीने चौकशी दरम्यान या हत्या सहज म्हणून केल्याचे सांगितलं. आरोपीनं अशाप्रकारे आणखी बऱ्याच जणांची हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. 
 
 2015 सालच्या हत्येच्या गुन्हयात त्याला अटक झाली होती मात्र पुराव्याअभावी त्याची 2016 साली सुटका झाली होती. सध्या आरोपी तुरुंगात असून भायखळा पोलीस दुसऱ्या हत्येच्या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

योगी - मोदी टार्गेट करताय, शिंदे बनावट हिंदू असल्याचे भासवताय, संजय राऊत यांनी शंकराचार्य वादावर राजकीय बाण सोडला

२०३२ नंतर दिल्ली नव्हे तर नागपूर भारताची राजधानी असेल! सर्वात प्रबळ दावेदार का ?

मुंबईत पुन्हा एकदा महिला महापौर, भाजपच्या 'या' ३ धाकड महिलांची नावे शर्यतीत सर्वात पुढे!

Balasaheb Thackeray Jayanti 2026 बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Subhash Chandra Bose Jayanti नेताजी सुभाष जयंती भाषण मराठीत

पुढील लेख
Show comments