Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नालासोपारात साक्षी ज्वेलर्सवर दरोडा, मालकाची हत्या

Webdunia
शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (22:25 IST)
मुंबईतील नालासोपारा (पश्चिम) येथील साक्षी ज्वेलर्सवर या दुकानावर शनिवार दरोडा पडला. दोन हल्लेखोरांनी दुकानाचे मालक किशोर जैन यांची हत्या करून लाखोंचा ऐवज लुटून नेला. 
 
नालासोपारा (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एसटी डेपो रोडवर साक्षी ज्वेलर्स हे दुकान आहे. शनिवारी सकाळी दुकानाचे मालक किशोर जैन यांनी नेहमी प्रमाणे दुकान उघडले. सकाळची वेळ असल्याने दुकानात अन्य कर्मचारी नव्हते. जैन दुकानात पूजा करत असताना दोन अज्ञात व्यक्ती दुकानात शिरले. त्यांनी जैन यांच्याकडे लॉकरची चावी मागितली. मात्र जैन यांनी चावी देण्यास नकार दिला. त्यामुळे हल्लेखोरांनी जैन यांच्यावर चाकूने सपासप वार केले. लॉकर उघडता न आल्याने हल्लेखोर दुकानामधील लाखो रुपयांचे दागिने घेऊन काही क्षणातच पसार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या किशोर जैन यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या लूट आणि हत्येचा घटनेने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून हल्लेखोरांचा शोधासाठी विविध पथके रवाना झाली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

कुत्र्याने घेतला बदला... धडकल्याच्या १२ तासांत वाहन मालकाचे घर शोधले, रात्री कार ओरबाडली

LIVE: सर्वोच्च न्यायालयाने भुजबळांना तुरुंगात जाण्यापासून रोखले

भीषण आगेत 76 जणांचा होरपळून मृत्यू

ट्रक दरीत कोसळून 10 जणांचा जागीच मृत्यू

नितीन गडकरींनी केला खुलासा हे उद्योग देशाच्या विकासात अडथळा ठरत आहे

पुढील लेख
Show comments