Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेपाळ विमान दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी आणि पुनमिया दोन कुटुंबियांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (15:42 IST)
नेपाळमधील तारा एअरलाईन्सचे दुर्घटनाग्रस्त विमान शोधण्यात नेपाळच्या लष्कराला यश आले . रविवारी सकाळी हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या विमानात 4 भारतीयांसह एकूण 22 प्रवाशी होते. शोध मोहिमेदरम्यान, मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 येथे या दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष आढळून आले आहेत. छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले मृतदेह ताब्यात घेण्याचे काम लष्कराकडून सुरू आहे.

नेपाळ सैन्याच्या शोध आणि बचाव दलाने विमान अपघात स्थळाचा प्रत्यक्ष शोध घेतला असून, विमानातील सर्वच प्रवासी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या 22 पैकी 14 लोकांचे शव ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून, काही मृतदेहांची ओळख अद्याप पटली नाही. बचाव दलाकडून सध्या तपास सुरु आहे. दरम्यान, या विमान अपघातात आणि सिक्कीममधील मोटार अपघातात ठाण्यातील त्रिपाठी आणि पूनमिया कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

<

नेपाळ मधील विमान तसेच सिक्कीम मोटार दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी व पूनमिया या दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील सर्व सदस्य त्यात लहान बालकांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे...
पर्यटकांसाठी असलेल्या सुरक्षिततेची पूर्तता अत्यावश्यकच आहे#भावपूर्णश्रद्धांजली

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 30, 2022 >आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, नेपाळमधील विमान तसेच सिक्कीम मोटार दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी व पूनमिया या दोन वेगवेगळय़ा कुटुंबांतील सर्व सदस्य त्यात लहान बालकांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे.पर्यटकांसाठी असलेल्या सुरक्षिततेची पूर्तता अत्यावश्यकच आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments