Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुट्टीसाठी विद्यार्थिनीने चाकू भोसकला, जखमी विद्यार्थीला भेटले CM योगी

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2018 (14:26 IST)
लखनौमध्ये सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्याच शाळेच्या स्वच्छतागृहात पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे..
 
शाळा लवकर सुटावी, म्हणून विद्यार्थिनीने त्याला भोसकल्याची धक्कादायक माहिती आहे. आपल्यावर हल्ला करताना ‘बॉयकटवाली दीदी’ तसे म्हणाल्याचे सात वर्षीय विद्यार्थ्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे. आरोपी असलेल्या 12 वर्षीय विद्यार्थिनीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याची मृत्यूशी झुंज सुरु आहे. किंग जॉर्ज्स मेडिकल युनिव्हर्सिटीतील ट्रॉमा सेंटरमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. विद्यार्थिनीचा फोटो पाहून जखमी विद्यार्थ्याने तिची ओळख पटवली.  ‘बॉयकटवाल्या दीदी’ने टॉयलेटमध्ये आपल्यावर चाकूने हल्ला केल्याचं त्याने सांगितलं. पोलिस संबंधित विद्यार्थिनीची कसून चौकशी करत आहेत. लखनौमधील त्रिवेणीनगर भागातल्या ब्राईटलँड इंटरकॉलेज स्कूलच्या टॉयलेटमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला. शाळेने हा प्रकार मीडियाला सांगितल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांना या घटनेची माहिती न दिल्याबद्दल जिल्हा निरीक्षकांनी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments