Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंदीगड: विद्यापीठातील मुलींचे आंघोळ करतानाचे व्हीडिओ व्हायरल, काय आहे प्रकरण?

Webdunia
रविवार, 18 सप्टेंबर 2022 (15:59 IST)
हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींचे आंघोळ करतानाचे व्हीडिओ एका मुलीनेच बनवले आणि मुलाला विकले. यानंतर 8 पीडितांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. चंदीगडजवळ एका खासगी विद्यापीठात हा प्रकार घडल्याचे सांगितले. विद्यापीठाने मात्र आत्महत्येच्या प्रयत्नाचे वृत्त फेटाळले आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एका व्हीडिओमध्ये, एका मुलीने हे मान्य केलंय की तिने आपल्या सोबतच्या इतर मुलींचा आंघोळ करत असताना व्हीडिओ बनवला होता.
 
हा व्हीडिओ तिने शिमला येथे राहणाऱ्या एका मुलाला पाठवला असा आरोप या मुलीवर आहे. या मुलाने पुढे तो व्हीडिओ व्हायरल केला.
 
संबंधित महाविद्यालयात यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.
 
रविवारी (18 सप्टेंबर) पहाटे 3 वाजता पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप पोलिसांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
काय आहे प्रकरण?
'विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीने मुलींचा आंघोळ करतानाचा व्हीडिओ व्हायरल केला,' मीडियाला विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या एका ऑडिओमध्ये म्हटलं आहे.
 
अनेक मुलींचे व्हीडिओ बनवून विद्यापीठ काही कारवाई करत नसल्याचे ती मुलगी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणते.
 
विद्यापीठात विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवला आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घोषणाबाजी करत विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही व्हीडिओ समोर येत आहे.
 
सुरुवातीला विद्यापीठाने हे प्रकरण स्वत:च्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर मग त्यांनी पोलिसांना बोलवलं.
 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील व्हीडिओ रेकॉर्ड करणाऱ्या मुलीविरोधात खरड पोलीस स्टेशनला एमएमएस तयार करून व्हायरसल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
संबंधित मुलीला पोलिसांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे. तसंच या मुलीला अटक करण्याचीही तयारी सुरू आहे.
 
एफआयआर दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. विद्यापीठाने कॅम्पसचे प्रवेशद्वार बंद केले आहेत आणि माध्यमांना आतमध्ये येण्याची परवानगी दिलेली नाही.
 
पंजाबचे शिक्षणमंत्री हरजोत सिंह बेंस यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. दोषींवर कडक कारवाई होईल असंही ते म्हणाले आहेत.
 
हे प्रकरण संवेदनशील असून महिलांच्या सन्मानाचे प्रकरण आहे. त्यामुळे माध्यमांसह आपल्या सगळ्यांना सावध राहण्याची आवश्यकता आहे.
 
नेमकी घटना काय आहे ते थोडक्यात पाहूया
 
* चंदीगडजवळ एका खासगी विद्यापीठात 8 विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
* विद्यापीठातील एका मुलीने काही मुलींचे व्हीडिओ बनवले आणि ते व्हायरल केले.
* जवळपास 60 विद्यार्थिनींचे व्हीडिओ बनवल्याची माहिती समोर येत आहे.
* आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुलींची प्रकृती गंभीर
* शनिवारी (17 सप्टेंबर) रात्री उशिरा हे प्रकरण समोर आल्यानंतर रविवारी विद्यापीठात खळबळ उडाली.
* पोलिसांनी संबंधित मुलीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
* कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
* शिमला येथील एका मुलाला हे व्हीडिओ पाठवण्यात आले होते, पोलीस या मुलाला अटक करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
 
विद्यापीठातील इतर काही व्हीडिओमध्ये काही विद्यार्थिनी बेशुद्ध अवस्थेत दिसत आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत. काही विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यापैकी काही मुलींची प्रकृती गंभीर आहे.
 
व्हीडिओ कोणी व्हायरल केला?
आणखी एका व्हायरल व्हीडिओमध्ये हॉस्टेलच्या वॉर्डन आरोपी मुलीची चौकशी करत आहेत. यावेळी या मुलीने असं सांगितल्याचं ऐकू येतं की, तिने काही व्हीडिओ बनवून शिमल्यातील एका मुलाला पाठवले होते.
 
वॉर्डनने यावेळी विद्यार्थिनीला विचारलं की तिने असं का केलं? यावर तिने काहीच उत्तर दिलं नाही.
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments