Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्तीसगड निवडणूक 2018: मुख्यमंत्री रमन सिंह सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असणारे उमेदवार

Webdunia
शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (16:53 IST)
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 12 नोव्हेंबर रोजी 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यात निवडणुकीत 190 उमेदवार त्यांचे भाग्य उजळण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापैकी राज्याचे मुख्यमंत्री, डॉ. रमन सिंह, असे उमेदवार आहे, जे सर्वाधिक वार्षिक उत्पन्न मिळवतात. रमन यांनी नामांकन भरताना आपल्या शपथपत्रात गेल्या वर्षी त्यांचे वार्षिक उत्पन्न 34 लाख 59 हजार रुपयांपेक्षा जास्त होते असे भरले आहे. तसेच जनता काँग्रेस छत्तिसगढ (जे)चे उमेदवार देवव्रत सिंह हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहे.
 
रविवारी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म आणि छत्तीसगड इलेक्शन वॉचने जारी केलेल्या आकड्यांनुसार, पहिल्या टप्प्यात 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहे. या टप्प्यात असलेल्या 187 उमेदवारांच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या शपथपत्रांचे विश्लेषण केले गेले आहे. तीन उमेदवारांचे शपथपत्र स्पष्ट नसल्यामुळे त्यांचे विश्लेषण होऊ शकले नाही. एडीआर आणि इलेक्शन वॉचद्वारे प्रदान केलेल्या माहितीनुसार, सर्वात श्रीमंत तीन उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री रमन सिंह यांचे देखील नाव आहे. त्यांची एकूण मालमत्ता 10,72,34,236 रुपये आहे. जेव्हा की सर्वात श्रीमंत उमेदवार खैरागडचे जनता काँग्रेस छत्तिसगढ (जे) चे उमेदवार देवव्रत सिंह आहे आणि यांची एकूण मालमत्ता 1,19,55,07,609 रुपये आहे. शपथपत्रांच्या आधारावर केलेल्या विश्लेषणात असे म्हटले गेले की पहिल्या टप्प्याचे उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री रमन सिंह यांची वार्षिक कमाई 2017-18 मध्ये सर्वाधिक होती. त्यांची वार्षिक उत्पन्न 34,59,130 रुपये आहे, तसेच त्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 59,83,853 रुपये आहे. या टप्प्यात निवडणूकीच्या स्पर्धकांमध्ये 42 उमेदवार मिलियनेअर आहे. काँग्रेस आणि भाजपाने जेथे 13-13 मिलियनेअर उमेदवार उभे केले आहे, व जनता काँग्रेस छत्तिसगढ (जे) म्हणजे अजित जोगी यांच्या पार्टीने 4 मिलियनेअर उमेदवार उभे केले आहे.
 
यावेळी निवडणूक लढवणारे सर्वात कमी मालमत्ता राजनांदगावच्या रिपब्लिक पार्टी पक्षाकडून निवडणुकांमध्ये उभ्या राहणार्‍या प्रतिभा वासनिक ह्या आहे. त्यांची एकूण मालमत्ता केवळ 1200 रुपये आहे. याशिवाय 9 उमेदवार आहेत ज्यांची मालमत्ता अडीच हजार ते 51 हजार रुपये आहे. यापैकी पाच उमेदवार स्वतंत्र आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments