suvichar

पंजाबमध्ये मुलाने एका मुलीमुळे आत्महत्या करून आपले जीवन गमावले

Webdunia
शुक्रवार, 3 जुलै 2020 (15:32 IST)
पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. जिल्ह्यातील प्रसिद्ध मेणबत्ती व्यावसायिकाच्या मुलाने एका मुलीमुळे आत्महत्या करून आपले जीवन (crime case love story) संपवले. मुख्य म्हणजे परदेशात राहणाऱ्या एका मुलीशी या घटनेचा संबंध आहे. परदेशात गेल्यानंतर या मुलीनं मृत सलीलचा फोन नंबर ब्लॉक केला होता, त्यामुळे सलील नैराश्येत होता, यातूनच त्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

चरणजित पुरी येथे राहणारे मेणबत्ती व्यापारी राजेश महेंद्रू यांचा मुलगा सलील याने आत्महत्या केली आणि कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला. 24 वर्षीय सलीलने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. सलीलच्या आत्महत्येमागील कारण म्हणजे ऑस्ट्रेलियात राहणारी एक मुलगी. सलील आणि या मुलीची 8 महिन्यांपासून मैत्री होती. या दोघांचे लग्नही झाल्याचे मृताच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
फोन नंबर ब्लॉक केला म्हणून होता नैराश्येत
मात्र ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर काही दिवसांनी या मुलीनं सलील आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा फोन नंबर ब्लॉक केला. यानंतर सलील चिंतेत आणि नैराश्येत (crime case love story) होता. याबद्दल सलिल खूप अस्वस्थही झाला होता. शेवटी त्यानं आत्महत्येचं पाऊल उचललं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांना या दोघांच्या लग्नाबाबत माहिती मिळाल्यानंतर सलीलला धमकावण्यास सुरूवात झाली.

पोलिसांनी केली चौकशीला सुरुवात

पोलीस अधिकारी भगतवीर सिंह या प्रकरणाची चौकशी करत आहेत. भगतवीर सिंह यांनी सांगितले की, सलीलचे वडील राजेश महेंद्रू यांनी असे निवेदन दिले आहे की मुलगा सलीलने या मुलीशी 8 महिन्यांपूर्वी कसबा नकोदरमधील एका गुरुद्वारामध्ये लग्न केले होते. या लग्नात मुलाची आई आणि मुलीच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा मुलीच्या वडिलांना या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा त्याने सलीलला धमकवण्यास सुरूवात केली आणि सलीलचा फोन नंबर ब्लॉक केला. ही मुलगी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाला गेली आणि सध्या तिथेच आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments