Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्र सरकारचा 'हा' निर्णय स्वागतार्ह आहे : एमआयएम

haj yatra
Webdunia
बुधवार, 17 जानेवारी 2018 (10:45 IST)
‘हज यात्रेसाठी देण्यात येणारं अनुदान रद्द व्हावं ही मागणी एमआयएमनं यापूर्वीच केली होती.  या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. कारण या अनुदानाचा फायदा हा फक्त एअर इंडियालाच होत होता. त्यामुळे हे अनुदान मुस्लीम मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केलं गेलं पाहिजे. अशी आमची मागणी आहे. हा मुद्दा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत अनेकदा मांडला होता. अखेर आज हा निर्णय जाहीर करण्यात आला. पण रद्द केलेलं अनुदान मुस्लीम मुला-मुलींच्या शिक्षणासाठी कशा पद्धतीने वापरलं जाणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.’ अशी प्रतिक्रिया  एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. 
 
दरम्यान, केंद्र सरकारनं हज यात्रेसाठीचं अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी 700 कोटींचे अनुदान हज यात्रेसाठी दिलं जायचं. मात्र, आता ते रद्द केल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments