Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हीट वेव ला घेऊन आईएमडीचा अलर्ट

Webdunia
बुधवार, 22 मे 2024 (10:32 IST)
उत्तर भारतात उद्ष्णतेची लाट आजून आहे. या दरम्यान हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट घोषित केला आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये येत्या पाच दिवसांमध्ये प्रचंड ऊन पडणार आहे. 
 
देशातील जास्त भागांमध्ये प्रचंड ऊन पडणार आहे. जास्त ऊन हे उत्तर, मध्य आणि पश्चिमी भारतात पडेल. जिथे तापमान वाढतच आहे. उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहे. तसेच आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. उष्णतेमुळे उद्योगधंदे प्रभावित होत आहे. या दरम्यान हवामान खात्याने देशातील या राज्यांमध्ये येणाऱ्या पाच दिवसांकरिता रेड अलर्ट घोषित केला आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, पाच दिवसांपर्यंत  दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश मध्ये उष्णतेपासून अराम मिळणार नाही.
 
हवामान खात्याने या राज्यांमध्ये रेड अलर्ट घोषित केला आहे. हवामान खात्याने सांगितले की, अशक्त लोकांनी स्वतःची काळजी जरूर घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसांमध्ये हिमाचल प्रदेशच्या पहाडांमध्ये खूप उष्णता भडकणार आहे. तसेच लोकांनी सुरक्षित राहावे असे आवाहन लोकांना हवामान खात्याने दिले आहे. 
हवामान खात्यानुसार, मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि चंडीगढ मधील काही भागांमध्ये तापमान 45 डिग्री सेल्सियसच्या वरती जाईल. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

पुढील लेख
Show comments