Festival Posters

भारतीय सैन्याच्या शब्दकोशात 'मार्टर' आणि 'शहीद' शब्द नाहीत

Webdunia
शनिवार, 16 डिसेंबर 2017 (09:46 IST)
देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाला शहीद असा उल्लेख आपण करतो. मात्र, भारतीय सैन्याच्या शब्दकोशात 'मार्टर' आणि 'शहीद' सारखे शब्दच नसल्याची माहिती समोर आली आहे.  संरक्षण आणि गृह मंत्रालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. आरटीआयमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. यात कायद्यानुसार शहीद या शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्याची परिभाषा काय आहे?
 
आरटीआयमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाला योग्य उत्तरचं मिळालं नाही. हा अर्ज गृह आणि संरक्षण मंत्रालयात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे गेला. पण योग्य उत्तर मिळूच शकलं नाही.  आता  यासंदर्भात सूचना आयुक्त यशोवर्धन आझाद यांनी सांगितले की, संरक्षण मंत्रालयातर्फे एका अधिकाऱ्याने म्हटलं की, 'मार्टर' आणि 'शहीद' सारख्या शब्दांचा वापर केला जात नाही. तर, त्याऐवजी 'बॅटल कॅज्युअल्टी' या शब्दाचा वापर करण्यात येतो. तर, गृह मंत्रालयात 'ऑपरेशन्स कॅज्युअल्टी' या शब्दांचा वापर करण्यात येतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments