Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओमर अब्दुल्ला यांनी पहिल्या पत्नीकडे मागितला घटस्फोट

imar abdulla
Webdunia
शनिवार, 3 मार्च 2018 (11:17 IST)

जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहिल्या पत्नीकडे घटस्फोट मागितला आहे. त्यामुळे अब्दुल्लांनी दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने ओमर यांची विभक्त पत्नी पायल यांना दिले आहेत.  अब्दुल्ला यांना  पुन्हा लगीनगाठ बांधण्याची इच्छा आहे. 'आमचा तुटलेला संसार कधीच जुळवता येऊ शकत नाही' असं ओमर अब्दुल्लांनी घटस्फोटाच्या अर्जात म्हटलं होतं.

न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल आणि दीपा शर्मा यांच्या खंडपीठाने पायल यांना नोटीस पाठवली आहे. 23 एप्रिल रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपूर्वी उत्तर देण्यास कोर्टाने सांगितलं आहे. पायल यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

1 सप्टेंबर 1994 रोजी ओमर अब्दुल्ला आणि पायल यांचं लग्न झालं होतं. ओमर अब्दुल्ला आणि पायल यांच्या नात्यात 2007 मध्ये कटुता आली होती.  2009 पासून दोघं विभक्त राहायला लागले. ओमर आणि पायल यांना दोन मुलं असून ती आईसोबत राहतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments