Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राहुल नंतर आता सोनिया गांधीदेखील गायब….

Webdunia
बुधवार, 16 ऑगस्ट 2017 (09:19 IST)
काही दिवसापूर्वी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गयाव झाल्याचे पोस्टर त्यांच्याच मतदार संघात झळकले होते आता त्यांच्या नंतर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी गायब झाल्याची पोस्टर रायबरेलीत झळकली आहेत. रायबरेली हा  कॉंग्रेसचा बालेकिल्ला आणि सोनिया गांधी यांचा पारंपरीक मतदासंघ म्हणून ओळखला जातो.
उत्तर प्रदेशातील अमेठी या पारंपरीक मतदारसंघातून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी  गायब झाल्याचे पोस्टर झळकले होते. या घटनेला काही दिवस उलटून जात आहेत तोच रायबरेलीतही या प्रकाराची पूनरावृत्ती झाली आहे. रायबरेलीतील गोरा बाजार, महानंदपूर आणि गवर्नमेंट कॉलनी येथे ही पोस्टर्स झळकली आहेत. रातोरात झळकलेल्या या पोस्टर्सची रायबरेलीसह देशभरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, ही पोस्टर्स कोणी लावली याबाबत माहिती उपलब्ध नाही. तसेच, ही पोस्टर्स लावणाऱ्याने पोस्टर्सवर आपले नावही लिहीले नाही.
पोस्टर्समध्ये लिहीले आहे की, ही पोस्टर्स रायबरेलीतील लोकांकडून लावण्यात आली असून, आमचे खासदार मतदारसंघात कधीच फिरकत नसल्यामुळे फसवणूक झाल्याची भावाना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. दरम्यान, कॉंग्रेस समर्थकांनी ही पोस्टर्स भींतींवरून हटवली आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments