Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेमी युगुलाचे मृतदेह हॉटेलच्या रूम मध्ये आढळले

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (11:38 IST)
दिल्लीतील जाफ्राबाद भागात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री येथे असलेल्या ओयो हॉटेलमध्ये एका प्रेमळ जोडप्याने टोकेचे पाऊल घेतले. दोघांनी आधी चार तासांसाठी हॉटेलची रूम बुक केली. यानंतर तरुणाने विवाहित प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्यावर स्वतः आत्महत्या केली.  दोघांचे मृतदेह हॉटेलच्या रूम मध्ये आढळले .बेडवर अर्ध्या पानाची सुसाईड नोटही लिहून  ठेवली होती. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असून त्यांनी एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा यात करण्यात आला आहे.सोहराब आणि आयेशा असे या मयत प्रेमी जोडप्यांची नावे आहे. 
 
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या ओयो हॉटेलमध्ये खोलीचा दरवाजा उघडत नसल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी दुपारी एक वाजता सोहराब आणि आयेशा दोघेही हॉटेलमध्ये आल्याची माहिती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचली.

या लोकांनी चार तासांसाठी एक खोली भाड्याने घेतली होती. मात्र मुदत पूर्ण होऊनही दोघेही खोलीबाहेर न आल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रात्री 7 वाजून 45 मिनिटांनी दरवाजा ठोठावला. पण खोलीतून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी बीट कॉन्स्टेबलला घटनास्थळी बोलावले. कॉन्स्टेबलच्या उपस्थितीत खोली उघडण्यात आली. 
 
सोहराब सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने लटकलेल्या अवस्थेत तर आयेशा बेडवर मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृतदेहावर गळा दाबल्याच्या खुणा आढळल्या. पलंगावर अर्ध्या पानांची हाताने लिहिलेली सुसाईड नोट सापडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी क्राईम टीम आणि एफएसएल टीमला घटनास्थळी पाचारण केले. पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. 

तपासाअंती, सोहराब  आणि आयशा अशी मृतांची नावे आहेत.सोहराब मेरठचा आहे तर  लोणी उ.प्र.येथे राहणारी आयशा ही मोहम्मद गुलफामची पत्नी होती आणि तिला 9 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी आहे. दोघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. 
 
 


Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments