Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वागीर : भारतीय नौदलात सामील झालेली ही पाणबुडी शत्रूला असा चकवा देऊ शकते

Webdunia
सोमवार, 23 जानेवारी 2023 (15:06 IST)
भारतीय नौदलात आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज झालेली 'वागीर' पाणबुडी सामील झाली आहे. ही पाणबुडी नौदलाच्या प्रोजेक्ट-75 च्या अंतर्गत मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल)मध्ये तयार झाली आहे. भारतीय नौदलाला गेल्या महिन्यात 20 डिसेंबरलाच वागीरची डिलिव्हरी देण्यात आली आहे.
 
शत्रूच्या रडारवर दिसणार नाही अशा प्रकारचं तंत्रज्ञान या पाणबुडीमध्ये वापरलं गेलं आहे. वागीरला 'स्टेट ऑफ़ आर्ट' पाणबुडी म्हटलं जात आहे. या पाणबुडीला भारतीय सामरिक क्षमता वाढविण्यासंबंधीचं एक उदाहरण म्हणून पाहिलं जात आहे.
 
वागीर ही कलवरी वर्गातील पाणबुडी आहे. यापूर्वी या वर्गातील चार पाणबुड्या नौदलात सामील करण्यात आल्या आहेत.
 
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा नौदलाने एक नोव्हेंबर 1973 ला वागीरल सेवेत सामील केलं होतं. या पाणबुडीने अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. तीस वर्षे सेवेत राहिल्यानंतर ही पाणबुडी 2001 मध्ये सेवेतून निवृत्त झाली.
 
त्यानंतर नवीन योजने अंतर्गत नोव्हेंबर 2020 मध्ये या पाणबुडीला पुन्हा एकदा नवीन आणि आधुनिक अवतारामध्ये पुन्हा एकदा नौदलाच्या ताफ्यात सामील करण्याचे आदेश दिले गेले.
 
ही भारतातील सर्वांत कमी काळात तयार झालेली पाणबुडी असल्याचा भारतीय नौदलाचा दावा आहे.
 
वागीर पाणबुडीची वैशिष्ट्यं
भारतीय नौदलच्या अधिकृत वेबसाइटनुसार वागीरची अनेक वैशिष्ट्यं आहेत ज्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत शत्रूचा सामना करण्यासाठी सक्षम आहे.
वागीरच्या समावेशानंतर भारताची सागरी सुरक्षेची क्षमता अजून वाढेल, असं म्हटलं जात आहे.
अनेक मोहिमांमध्ये ही पाणबुडी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अँटी सरफेस, अँटी सबमरीन, गुप्त मोहिमा तसंच समुद्रात स्फोटकं पेरण्यात वागीर पाणबुडीचा वापर होऊ शकतो.

भारतीय नौदलाने या पाणबुडीला 'सँड शार्क’ (शत्रूची नजर चुकवून हल्ला करणाऱ्यात सराईत) म्हटलं आहे. यातूनच वीगरची मजबूती आणि हल्ला करण्याची क्षमता हे गुण दिसून येतात.
 
नौदलाच्या प्रोजेक्ट-75 अंतर्गत कलवरी वर्गातील सहाव्या पाणबुडीची निर्मितीही मोठ्या वेगाने होत होती. हे एका फ्रेंच कंपनीचं डिझाइन आहे.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार सागरी सुरक्षेमध्ये वागीरमुळे भारताला फायदा होईल असं एका नौदल अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
 
यातून अत्याधुनिक नौका आणि पाणबुडी निर्मिती केंद्राच्या रुपाने एमडीएलची क्षमताही दिसून येत असल्याचं नौदलचं म्हणणं आहे.
 
हिंदी महासागरातलं चीनचं वाढतं वर्चस्व
गेल्या काही काळापासून भारताचे चीनसोबतचे संबंध ताणलेले आहेत. चीन हिंदी महारासागरात आपलं वर्चस्व वाढवण्याच्या तयारीत आहे.
 
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात श्रीलंकाने चीनची युद्धनौका 'यूआन वांग 5'ला हंबनटोटा बंदरामध्ये येण्याची परवानगी दिली होती. यावर भारताने श्रीलंका सरकारकडे आपली चिंता व्यक्त केली होती. ही एक टेहळणी नौका असल्याचं म्हटलं होतं.
 
श्रीलंकेतलं हम्बनटोटा बंदर हे चीनच्या मदतीने बनवलं गेलं होतं आणि कर्ज न फेडता न आल्याने चीनकडे हेच बंदर 99 वर्षांसाठी गहाण ठेवलं. आता याच बंदराचा वापर चीन सैनिकी कारवायांसाठी करू शकतो, अशी भीती भारताला वाटत आहे.
 
जाफनामध्ये चीनचं अस्तित्त्व भारतासाठी धोक्याची घंटा ठरु शकतं, कारण श्रीलंकेचा हा भाग तामिळनाडूपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे.
 
एकीकडे शेजारी देशांसोबत सीमेवर तणाव असताना, दुसरीकडे भारताकडून आपल्या लष्कराच्या आधुनिकीकरणाचेही प्रयत्न केले जात आहेत.
 
गेल्या महिन्यात 18 डिसेंबरला पी15बी ही क्षेपणास्त्र विध्वंसक नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली.
 
यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं की, "माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडने बनवलेली ही युद्धनौका देशाच्या संरक्षण उपकरणं तयार करण्याच्या क्षमतेचं सर्वांत मोठं उदाहरण आहे.
 
येत्या काळात आपण केवळ आपल्या गरजांसाठीच नाही, तर जगाच्या गरजांच्या दृष्टिकोनातूनही युद्धनौका बनवू शकतो.”
त्यांनी म्हटलं, “भारत त्या देशांपैकी एक आहे, ज्यांचे हितसंबंध हे थेट हिंदी महासागराशी जोडले गेले आहेत. या भागातील एक महत्त्वपूर्ण देश असल्यामुळे देशाच्या संरक्षणात नौदलाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते.”
 
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात भारताने आपल्या सर्वांत मोठ्या युद्धनौकेला ‘विक्रांत’ला नौदलात सामील केलं.
त्यावेळी बीबीसीशी बोलताना व्हाइस अडमिरल एके चावला (निवृत्त) यांनी म्हटलं होतं, “80 च्या दशकांत आर्थिक उदारीकरणानंतर चीनच्या लक्षात आलं की नौदलाची ताकद न वाढवता, तो जागतिक महासत्ता बनू शकणार नाही. आज चीन जगातील एक सशक्त नौदल आहे आणि अतिशय वेगाने एअरक्राफ्टही बनवत आहे.”
 
Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments