Festival Posters

पुण्यात 12 वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025 (14:35 IST)

पुण्यातील रावेत येथे 18 वर्षीय तरुणाने अभ्यासाच्या तणावाखाली येऊन राहत्या खोलीत नॉयलॉनच्यादोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सदर घटना सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडली आहे. अवधूत अरविंद मोहिते (18) असे या मयत तरुणाचे नाव आहे.

ALSO READ: पुणे IT इंजिनिअरचे अल-कायदा लिंक? ATS ची धक्कादायक कारवाई!

अवधूत हा मूळगाव वाखरी, ता. फलटण, जि. साताराचा रहिवासी असून रावेतच्या एका महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकायचा. सोमवारी त्याने पहाटे पावणे तीनच्या सुमारास खोलीत नॉयलॉनची दोरी पंख्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.

ALSO READ: पुणे पोलिसांची नागपूर शहरातील एका तरुणीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक

थोड्याच वेळात ही घटना त्याच्या खोलीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आली त्याने शेजारच्यांच्या मदतीने तातडीने अवधूतला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ALSO READ: पुण्यातील इंदापूरमध्ये गर्भवती महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला

तो शांत आणि अभ्यासू विद्यार्थी असून गेल्या काही दिवसांपासून अभ्यासाच्या तणावाखाली होता. त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करत आहे.

Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

RCB vs GT : क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीचा सामना गुजरात टायटन्सशी, प्लेइंग ११ जाणून घ्या

LIVE: धुळे येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून खळबळजनक हत्या

धुळे येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरुणाची चाकू भोसकून हत्या

बायकुला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सैफ मस्तानला अटक

GT vs RCB : गुजरात आणि RCB यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना कधी, कुठे

पुढील लेख
Show comments