Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोलीस आयुक्तांची दणकेबाज कारवाई; शहरातील दोन कुंटणखाने ‘सील’

Webdunia
गुरूवार, 11 मार्च 2021 (07:48 IST)
पुण्यात पोलीस आयुक्तांच्या दणकेबाज कारवाईने गुन्हेगार अन् अवैध धंदेवाल्यांची पळताभुई झाली आहे. आता कुंटण खान्यावर कारवाईला सुरुवात केली असून, कोरेगाव पार्क आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन कुंटण खाने सील करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.
 
कोरेगाव पार्क येथील जी रेसिडन्सी लॉज व फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुधवार पेठ भागातील महामुनीवाडा अशी सील केलेल्या कुंठण खान्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या दोन ठिकाणी छापे टाकत येथील वेश्या व्यवसाय उघडकीस आणला होता. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने दोन्ही कुंटण खाने सील करावेत म्हणून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
 
त्यानुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलीस आयुक्तांना जिल्हा दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी हे दोन्ही कुंटण खाने सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कुंटण खाने सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संबंधित माहिती

सांगली : मध्यरात्री कालव्यामध्ये पडली ऑल्टो कार, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

रेमल चक्रीवादळाने घेतला 33 जणांचा बळी

खोलीमध्ये सडत राहिला मृतदेह...महिला कबड्डी प्लेयरची कोच ने च का केली हत्या?

LOC जवळ दिसले संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन, BSF ने केला गोळीबार

रेमल चक्रीवादळाचा हाहाकार!

कुटुंबातील 8 सदस्यांची कुऱ्हाडीने हत्या केली, नंतर स्वतः फाशी घेत आत्महत्या केली

पुणे पोर्शी कार अपघात प्रकरणातील डॉक्टरचे नाव किडनी रॅकेट मध्ये

अरविंद केजरीवाल यांना मोठा झटका, 2 जूनला पुन्हा तुरुंगात जावे लागणार

जीवदानी माता मंदिरात जाणाऱ्या भाविकांचा जीप अपघात, 3 ठार, 7 गंभीर

पावसाळ्यात मुंबईतील रस्ते पाण्याखाली गेल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा

पुढील लेख
Show comments