Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहता यांचं निधन

Webdunia
बुधवार, 12 जानेवारी 2022 (21:01 IST)
पुण्यातल्या मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे संचालक सुनील मेहता (५६) यांचं आज निधन झालं.  त्यांच्यावर पूना हॉस्पिटल इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान हळूहळू अवयव निकामी होत गेल्याने त्यांचं निधन झालं. गेल्या १५ दिवसांपासून मेहता हे पुण्यातल्या पूना हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनसाठी उपचार घेत होते. मात्र अवयव निकामी होत असल्याने त्यांना दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
 
 प्रकाशन व्यवसायामध्ये आधुनिकीकरणासाठी पावल उचलण्यामध्ये त्यांचे नाव अग्रेसर होते. सध्याच्या पिढीतील अनेक ख्यातनाम व्यावसायिकांना मेहता पब्लिकेशनच्या माध्यमातून ओळख मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. समाजातील अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या लेखकांना लिहित करण्यासाठी या संस्थेने संधी दिली. त्यामुळेच अनेक दर्जेदार साहित्याची निर्मिती करणारे लेखक घडवण्याचे श्रेय या संस्थेकडे जाते. अनेक लेखकांना संधी देऊन दर्जेदार साहित्य घडवण्याचे काम मेहतांच्या नेतृत्वात झाले. वाचकांना समृद्ध करणारा प्रकाशक म्हणून त्यांची ओळख होती. मेहता पब्लिकेशनची पुस्तके ऑनलाईन पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments