Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कायद्याचा दुरूपयोग करून केंद्रीय यंत्रणाकडून कारवाई- नाना पटोले

ED
Webdunia
गुरूवार, 31 मार्च 2022 (15:17 IST)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं गुरूवारी पहाटे धाड  टाकली. जवळपास पाच तास चाललेल्या या धाडसत्रानंतर आता सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. ईडीच्या या धाडीनंतर नाना पटोले  यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर  जोरदार हल्ला चढवलाय. यावेळी कायद्याचा दुरूपयोग करून केंद्रीय यंत्रणाकडून कारवाई केली जाते असा  अशा शब्दात नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.
 
नाना पटोले यांनी मुंबईत परिषद घेत, मोदी सरकार आणि देशाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शक्तींविरोधात मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. अशा व्यक्तींचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरण आणि निमगडे प्रकरणात सतीश उके यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच सतीश उके यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याकडील फाईल्स जप्त करण्यात आल्या. ईडीच्या कायद्यात कोणावर कारवाई करावी, हे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे नियम डावलून ईडीचा गैरवापर सुरु आहे. त्यामुळे आता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि देशाच्या सरन्यायाधीशांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. भाजपच्या हिटलशाहीपासून देशातील लोकशाही वाचली पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

नागपूर हिंसाचारामागील सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली, २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

दिल्लीच्या माजी पोलिस अधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली

Nagpur violence: नागपुरात आता परिस्थिती नियंत्रणात, संवेदनशील भागात कर्फ्यू सुरूच

LIVE: हिंसाचारानंतर नागपुरात परिस्थिती नियंत्रणात

अहिल्यानगर : बारावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या, विहिरीत आढळले मृतदेहाचे तुकडे

पुढील लेख
Show comments