Marathi Biodata Maker

अमरावती : दोरीच्या साह्याने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या

Webdunia
शनिवार, 16 मार्च 2024 (09:35 IST)
बुधागड शेत शिवरामध्ये ५९ वर्षीय शेतकऱ्याने दोरीच्या साह्याने निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ७ वाजता उघडकीस आली. बुधागड हे अमरावती जिल्ह्याच्या खोलापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गांव आहे. दादाराव बळीराम तानोळकर असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
 
दादाराव यांच्यावर कर्जाचा डोंगर असल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या विंचनेतून त्यांनी गळफास लावून जीवन संपवले. सततच्या नापिकीमुळे ते निराश होते. मृतकाच्या नातेवाईकांनी थेट खोलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीनुसार खोलापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
 
घटनेची माहिती मिळताच खोलापूरचे ठाणेदार ईश्वर वर्गे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठवण्यात आला. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार ईश्वर वर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. कैसर खान व खोलापूर पोलीस करीत आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

संजय राऊतांमुळे शिवसेना फुटली', भाजप नेत्याचा मोठा दावा

LIVE: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार नाही

संचार साथी अ‍ॅप म्हणजे काय, ते कसे काम करेल आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत

गोलगप्पा तोंडात घालताच जबडा लॉक झाला, महिलेचे तोंड उघडेच राहिले

बंगालच्या उपसागरात भूकंपाचे धक्के जाणवले

पुढील लेख
Show comments